शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

नियम धाब्यावर बसवून १३३ पदांसाठी भरती ? यवतमाळ जिल्हा बँकेतील वादग्रस्त पदभरतीला तडकाफडकी स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:39 IST

Yavatmal : आमदार बाळासाहेब मांगूळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी दाखल केली होती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधातयवतमाळ जिल्हा केलेल्या तक्रारीवर दहा दिवसांत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना दिला असतानाच बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सहकार विभागाच्या अवर सचिव मंजूषा साळवी यांनी या पदभरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. स्थगितीचे आदेश यवतमाळमध्ये धडकताच एकच खळबळ उडाली. दरम्यान यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी बुधवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या आदेशांची माहिती दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरती स्थगित करावी, अशी मागणी मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड व शिवसेना संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे सहकार विभागाच्या अवर सचिवांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना पत्र दिले असून आपल्या स्तरावरून बँकेला याबाबत सूचित करण्यास सांगितले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 'नाबार्ड'चे नियम धाब्यावर बसवून १३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. याविरोधात मुख्यमंत्री, सहकार मंत्री व सहकार विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यावर ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने बेकायदेशीर भरती प्रकरणासह गैरव्यवहाराची चौकशी १० दिवसांत करण्याचे आदेश सहकार सचिवांना दिले, अशी माहिती आमदार बाळासाहेब मांगूळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी बुधवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेली बँक आरबीआय, नाबार्ड आणि सहकार विभागाच्या देखरेखीत आहे. मात्र, त्यानंतरही बँकेच्या व्यवस्थापनाने बेकायदेशीर पदभरती, आर्थिक गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार केला आहे. २०१८ ची पदभरतीही नियमबाह्य होती. 

५१६ कोटींच्या अपहाराची स्वतंत्र चौकशी करा

  • भरती प्रक्रिया तत्काळ थांबवून जाहिरात रद्द १ करावी. नाबार्ड किंवा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून ५१६ कोटींच्या अपहाराची स्वतंत्र चौकशी करावी.
  • गैरजबाबदार अधिकारी व संचालकांवर कारवाई करावी. भविष्यातील भरती केवळ उघड आणि पारदर्शक निविदा प्रक्रियेतून राबवावी, अशी मागणी यावेळी आमदार बाळासाहेब मांगूळकर - आणि माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी केली.
  • लेखा व लेखापरीक्षणातील गंभीर तक्रारी असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभरती मंजूर करून नियमबाह्यरित्या प्रक्रिया पुढे चालू ठेवली.
  • मार्च २०२४ मध्ये सहकार आयुक्तांनी पदभरतीसाठी सहा खासगी एजन्सींची निवड केली. त्यानंतर संचालक मंडळाने आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही ३४८ पदे भरण्याचा ठराव मंजूर केला.
  • स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता ऐनवेळी अमरावती येथील एमआयएचएसटी या एजन्सीचा समावेश केला. ई-मेलद्वारे निविदा स्वीकारून अमरावतीच्या एजन्सीला नियुक्त केले.
  • चुकीची वयोमर्यादा पदभरती जाहिरातीत नमूद केली, आदी विषयाला अनुसरून रिट याचिका दाखल केली होती, असे आमदार मांगूळकर यांनी सांगितले.

 

"शासनाने १३३ पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. नियमानुसार एजन्सीची निवड करून शासनाच्या नियमानुसार पदभरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे बँकेवर कुठलाही बोजा पडणार नाही."- मनीष पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक, यवतमाळ

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal District Bank's controversial recruitment halted amid rule violations.

Web Summary : Nagpur High Court ordered probe into Yavatmal District Bank's 133 recruitments, following complaints of violating NABARD rules. Recruitment suspended after allegations of irregularities, financial mismanagement, and corruption. An investigation into a 516 crore scam is demanded.
टॅग्स :YavatmalयवतमाळbankबँकnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय