शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

राज्यातल्या १८ जिल्ह्यांतील गुन्हे शाबितीचे प्रमाण दहा टक्क्यांच्याही आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:56 AM

राज्यातील प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण चिंताजनक आहे. १८ जिल्ह्यात तर हे प्रमाण दहा टक्क्यांच्याही खाली असल्याचा अहवाल खुद्द राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने राज्याच्या गृहसचिवांना सादर केला आहे.

ठळक मुद्देसीआयडीचा अहवाल सरकारी अभियोक्त्यांच्या ‘परफॉर्मन्स’ची तपासणी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण चिंताजनक आहे. १८ जिल्ह्यात तर हे प्रमाण दहा टक्क्यांच्याही खाली असल्याचा अहवाल खुद्द राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने राज्याच्या गृहसचिवांना सादर केला आहे.भारतीय दंडसंहिता व अन्य प्रकारातील गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये हिंगोली, कोल्हापूर, परभणी, लातूर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, नांदेड, सांगली, गोंदिया, अकोला, बीड, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर व बुलडाणाचा समावेश आहे. १० ते २० टक्क्यांदरम्यान असलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये वर्धा, गडचिरोली, नंदूरबार, चंद्रपूर, उस्मानाबाद, सातारा, अमरावती, जालना व भंडाराचा समावेश आहे.न्यायालयात दाखल खटल्यातील गुन्हे शाबितीच्या आढाव्याची त्रैमासिक बैठक २५ आॅक्टोबर २०१७ ला झाली होती. त्यात पुणे सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालकांनी आपला विश्लेषणात्मक अहवाल अपर मुख्य सचिवांना (गृह) सादर केला. त्यानंतर २ डिसेंबरला अभियोग संचालनालयात त्यावर चर्चा झाली. त्यातील अहवालाच्या प्रती नुकत्याच राज्यातील सर्व सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना (एपीपी) पाठविण्यात आल्या आहेत. आगामी त्रैमासिक बैठकीसाठी त्यांच्या ताज्या ‘परफॉर्मन्स’ची अर्थात गुन्हे शाबितीच्या प्रमाणाची माहिती मागण्यात आली आहे. प्रमाण कमी असण्यामागील कारणेही विचारण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे सीआयडी नवा अहवाल शासनाला सादर करणार आहे.शिक्षेचे प्रमाण २० टक्क्यापर्यंत असलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश असून त्यात वर्धा पहिल्या क्रमांकावर आहे.

सरकारी वकिलांना प्रोत्साहनगुन्हे शाबितीच्या प्रमाणात जिल्ह्याच्या सरासरी आकडेवारीत घट दिसत असली तरी काही सरकारी अभियोक्त्यांची कामगिरी ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील अशा काही सहाय्यक सरकारी वकिलांना प्रोत्साहन म्हणून गृहखात्याकडून गौरविले जाणार आहे.निर्दोष सुटकेमागील कारणेन्यायालयात दाखल खटल्यात गुन्हे सिद्ध न होणे, पर्यायाने शिक्षा न होणे, त्यातून गुन्हे शाबितीची टक्केवारी घटणे, आरोपी निर्दोष सुटणे यामागे विविध कारणे सांगितली जातात. पंच-साक्षीदार फितूर होणे, सदोष तपास, टायमिंग मॅच न होणे, तेच ते पंच असल्याने कोर्टाचा त्यांच्यावर नसलेला विश्वास, सदोष जप्ती पंचनामा, सरकारी पंचाचा अभाव, सरकारी वकिलांना चार्जशिटची (पीपी सेट) प्रत न मिळणे आदी प्रमुख कारणे पुढे आली आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा