दुर्मिळ ‘क्रिपर’ पक्ष्याची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:48 IST2020-05-22T18:47:32+5:302020-05-22T18:48:00+5:30
विदर्भात अतिशय दुर्मिळ असलेला ‘इंडियन स्पॉटेड क्रिपर’ हा पक्षी पांढरकवडा येथे आढळला आहे. पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी या पक्ष्याची नोंद घेतली.

दुर्मिळ ‘क्रिपर’ पक्ष्याची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भात अतिशय दुर्मिळ असलेला ‘इंडियन स्पॉटेड क्रिपर’ हा पक्षी पांढरकवडा येथे आढळला आहे. पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी या पक्ष्याची नोंद घेतली.
पांढरकवडा तालुक्यातील वाई (गुरुद्वारा) येथील जंगल परिसरात हा पक्षी विराणी यांना आढळला. झाडाच्या खोडाशी अत्यंत साधर्म्य साधणाऱ्या या पक्षाला शोधणे कठीण असते. जुन्या वृक्षांच्या सालीवरील किडे खाण्यासाठी हे पक्षी हालचाल करताना आढळतात. या पक्षाचा आकार केवळ १५ सेंटीमिटर तर वजन १६ ग्रॅम एवढे असते.
राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशातील बस्तर, बांधवगढ या भागात हा पक्षी प्रामुख्याने आढळून येतो. परंतु, विदर्भात मात्र हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे, अशी माहिती डॉ. रमझान विराणी यांनी दिली.