शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे बियाणे महाराष्ट्रात यशस्वी ! विशिष्ट सोयाबीन खरेदीसाठी बियाणे कंपन्यांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:32 IST

Yavatmal : खुल्या बाजारात सध्या नियमित सोयाबीनला ३,८०० ते ४,६०० रुपये क्विंटल दर मिळत असताना, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल ५,५०० ते ७,५०० रुपये क्विंटल इतका उच्च दर मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजारात सध्या नियमित सोयाबीनला ३,८०० ते ४,६०० रुपये क्विंटल दर मिळत असताना, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल ५,५०० ते ७,५०० रुपये क्विंटल इतका उच्च दर मिळत आहे. विशेष म्हणजे, या विशिष्ट सोयाबीनचे वाण राजस्थानातून महाराष्ट्रात आले आहे. या सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, बियाणे कंपन्यांमध्ये ते खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. परिणामी, विदर्भातील अनेक शेतकरी कारंजा आणि वाशिम बाजारपेठेकडे वळत असून, जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने या बाजारात दाखल होत आहेत.

गत तीन ते चार वर्षापासून राजस्थानातील एका विशिष्ट जातीच्या बियाणाचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. पांढऱ्या फुलाचे आणि बरबटीच्या आकाराच्या सोयाबीनवर काळी रेषा आहे. यामुळे हे सोयाबीन प्रचलित सोयाबीनच्या तुलनेत लवकर ओळखता येते. याचा उत्पादन कालावधी इतर सोयाबीनसारखाच आहे. मात्र, हे बियाणे कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला बळी पडत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांकडून अशा सोयाबीनची लागवड वाढत आहे. भविष्यातील हा कल पाहता बियाणे कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडून हे विशिष्ट सोयाबीन बियाणे घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच कारंजा आणि वाशिम बाजारपेठेत विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला दर मिळावा म्हणून गर्दी केली आहे. ही गर्दी या दोन्ही बाजारपेठेत आवाक्याबाहेर गेली आहे. 

शेतकरीच कृषी शास्त्रज्ञांच्या वाटेवर

बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. अशा स्थितीत बदलत्या वातावरणात टिकणारे बियाणे बाजारात येणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रचलित बियाणांवर संशोधन आवश्यक आहे. याची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांकडे आहे. मात्र, शेतकरी देखील आपल्या स्तरावर प्रयोग करत आहेत. यातून राजस्थानची व्हरायटी महाराष्ट्रात यशस्वी झाली. त्यातून बाजारात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे.

अनेक कंपन्यांकडे मोजकेच बियाणे

अति पावसाने राज्यात सोयाबीनचे सीड प्लॉट उद्ध्वस्त झाले. पुढील वर्षी सोयाबीन लागवड करण्यासाठी अनेक कंपन्यांकडे बियाणे मोजकेच आहेत. अशा स्थितीत बियाणे कंपन्या बाजारातून सोयाबीन खरेदी करीत आहेत. त्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी केल्यावर हे सोयाबीन बियाणे कंपन्या विक्रीला आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Soybean Seeds Succeed in Maharashtra; Companies Vie for Purchase

Web Summary : Rajasthan soybean variety thrives in Maharashtra, fetching high prices (₹5,500-₹7,500/quintal). Farmers are drawn to its virus resistance, leading to increased cultivation. Seed companies compete to buy it, causing market activity in Karanja and Washim.
टॅग्स :SoybeanसोयाबीनFarmerशेतकरीfarmingशेतीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्रRajasthanराजस्थान