शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 2, 2016 02:45 IST

जिल्ह्याला अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. महागाव तालुक्याला वादळी पावसाचा जबर तडाखा बसला.

महागावला सर्वाधिक : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्ग ठप्प यवतमाळ : जिल्ह्याला अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. महागाव तालुक्याला वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावर मोठमोठ्ठाले वृक्ष उन्मळल्याने वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ परिसरात जोरदार पाऊस कोसळला. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रबी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. उमरखेड, महागाव तालुक्याला फटका बसला. रविवारी जिल्ह्यातील विविध भागात तुरळक पाऊस झाला. महागाव तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळासारखे वादळ सुरू झाले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वृक्ष उन्मळून पडली. धनोडा ते हिवरा दरम्यान ५० ते ६० वृक्ष कोसळल्याची माहिती आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वादळाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाले असून अंबोडा येथील यात्रेलाही याचा फटका बसला. मोहदी आणि गुंज परिसराला वादळाचा तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले. यवतमाळ शहरात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अचानक टपोर थेंबाच्या पावसाला प्रारंभ झाला. या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न-स्वागत समारंभाला मोठा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसाचा सर्वांनीच धसका घेतला. (शहर वार्ताहर)