शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पुसदला कोरोनाने निवृत्त बँक अधिकाऱ्यांसह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटका आला होता. त्याला उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे१४ नवे पॉझिटिव्ह : एकूण रुग्णसंख्या ५१७ वर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा आणखी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर पुसद येथील दोघांचा उपचारादरम्यान वर्धा व यवतमाळ येथे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १८ जणांचा बळी घेतला. तर कोरोना रुग्णांची एकंदर संख्या ५१७ झाली असून सध्या १४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटका आला होता. त्याला उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्धेतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी पुसद शहरातील गढी वार्डात असलेल्या एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.शुक्रवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १४ जणांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपुरा) येथील एक पुरुष, भोसा येथील सरस्वती ले-आऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखनगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील संभाजीनगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीकवार्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वार्ड क्र.१ मधील पुरुष, उमरखेड येथील अन्य एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधीनगर येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३५७ रुग्ण बरे झाले. सद्यस्थितीत १३२ जण भरती आहेत. शुक्रवारी ५८ नमुने तपासणीस पाठविले गेले. आतापर्यंत ८६२४ पैकी ८५२० नमुन्यांचे अहवाल प्राप्त आहे. आणखी १०४ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ८००३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले.आणखी २१ जणांची कोरोनावर यशस्वी मातजिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच २१ जणांनी कोरोनावर यशस्वी मातही केली आहे. आयसोलेशन वार्डात उपचारानंतर बरे झालेल्या या २१ जणांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. तूर्त १४४ रुग्णांवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.बनावट ई-पास, दोघांना लोहारा चौकात अटकअमरावतीवरून येणाºया एमएच-२९-बीसी-४५७९ क्रमांकाच्या वाहनाची गुरुवारी रात्री लोहारा चौकात तपासणी केली असता त्याची ई-पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून एजाज खान युसुफ खॉ पठाण रा. वाघाडी भोयर, निदान प्रदीपराव लोखंडे रा. गुलमोहर अर्पाटमेंट आर्णी रोड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. त्यांचे वाहनही जप्त करण्यात आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या