शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या महिलेचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात ५७ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४८ जण भरती आहे.

ठळक मुद्देकोरोना बळींची संख्या ५७ : कोरोनामुक्त झाल्याने ४१ जणांना रुग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंतची एकूण मृत्यूसंख्या ५७ झाली आहे. एकूण रुग्णसंख्या २ हजार ७८ झाली असून त्यापैकी १ हजार ३८८ बरे झाले. तर आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शुक्रवारी मृत झालेली ७५ वर्षीय महिला ही पुसद तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी होती. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ४५ जणांमध्ये ३१ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे.सर्वाधिक १३ रुग्ण दारव्हा तालुक्यात आढळले. त्याखालोखाल आर्णी येथे १० रुग्ण आढळले. उमरखेड तालुक्यात ५ रुग्ण आढळले असून त्यात ढाणकीतील एका पुरुषाचा समावेश आहे. पुसद, घाटंजी शहर तसेच बाभूळगावच्या डेहणीत प्रत्येक १, तसेच दिग्रस, नेर व पांढरकवडा शहरात प्रत्येकी २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात ५७ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४८ जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३३ हजार ५८९ नमुने तपासणीसाठी पाठविले. यापैकी ३३ हजार ७८ प्राप्त तर ५११ अप्राप्त आहेत. तसेच ३१ हजार नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक घेतली. कोरोना नियंत्रणासाठी करावयाच्या आणखी व्यापक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.शिवाजी चौक, शासकीय वसाहत, सुवर्णानगरीत रुग्णयवतमाळ शहरातील ८ रुग्णांची भर पडली असून त्यात शासकीय वसाहत येथील एक पुरुष, शिवाजी चौक येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक १ येथील एक महिला, सुवर्णा नगरी येथील एक पुरुष यासह शहरातील ३ रुग्ण व यवतमाळ तालुक्यातील शेकलगाव येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या