शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये दोन दिवसात २३ कोरोना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रामनगर एक, लक्ष्मीनगर एक व द्वारकानगरीतील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदपूर, बेलुरा व इसापूर येथील चौघांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह १०३ : २७१ जणांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत आणखी २३ रुग्णांची भर पडली. याशिवाय तालुक्यातील बेलोरा येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे शहर व तालुक्यात दहशत पसरली आहे.गेल्या पंधरवड्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत नव्याने १७ रुग्णांची भर पडली. शुक्रवारी अ‍ॅन्टीजन चाचणीमध्ये दोन व आणखी चार रुग्णांची भर पडली. शुक्रवारी दुपारपर्यंत २३ रुग्ण वाढले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडा आता ३८५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत तब्बल २७१ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तूर्तास तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०३ वर पोहोचल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले.शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रामनगर एक, लक्ष्मीनगर एक व द्वारकानगरीतील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदपूर, बेलुरा व इसापूर येथील चौघांचा समावेश आहे. याशिवाय गुरुवारी बेलोरा येथील एका ७६ वर्षीय महिलेला प्रकृती खालावल्याने यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती डॉ.आशीष पवार यांनी दिली. यामुळे तालुक्यात कोरोनाबळींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. यामुळे शहरासह खेडयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांनी सूचनांचे पालन करावेकोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासन व प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच विविध सूचना दिल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या