शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पैनगंगासाठी जनजागृती

By admin | Updated: October 8, 2015 02:20 IST

घाटंजी तालुक्यातील खडका-खंबाळा येथे होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जनचळवळ आणि आंदोलन उभारले जाणार आहे.

शिवाजीराव मोघे : पांढरकवडा येथे सर्व पक्षीयांचा जागृती मेळावायवतमाळ : घाटंजी तालुक्यातील खडका-खंबाळा येथे होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जनचळवळ आणि आंदोलन उभारले जाणार आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृतीसाठी पांढरकवडा येथे शुक्रवार, ९ आॅक्टोबर रोजी सर्व पक्षीय मेळावा घेण्यात येत आहे. ‘अभी नही तो कभी नही’ हा नारा घेऊन प्रकल्पाचे काम शासनाने सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा आणि तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्याला मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास दुर्लक्षित क्षेत्राचा भाग विकास मार्गावर येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहे. केंद्रीय वनखात्याची अंतिम मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याकडून पर्यावरण प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. विविध ठिकाणच्या न्यायालयात दाखल प्रकरणे निकाली निघाली आहे. पुनर्वसन आणि पुनर्स्थापन आराखड्यालाही केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात कुठलीही अडचण नाही. या प्रकल्पातील ८० टक्के पाणी महाराष्ट्राला तर १२ टक्के तेलंगाणाला मिळणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प म्हणूनही हा प्रकल्प होऊ शकतो. यासाठीचे निकष प्रकल्पाने पूर्ण केले आहे. आंतरराज्यीय प्रकल्प आणि दोन लाख हेक्टर सिंचन क्षमता या दोनही अटीमध्ये हा प्रकल्प पूर्ण आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होणे आवश्यक आहे. काम सुरू झाल्यास केवळ १५ दिवसात ९५ टक्के रक्कम केंद्र शासनाकडून उपलब्ध होऊ शकते. जमिनीचा मोबदला आणि इतर सुविधाही जमीन मालकांना मिळणार आहे. बाजार भावाच्या पाचपटीने रक्कम शेतजमिनीला मिळणार असून शेतातील विहीर, तार कंपाऊंड, फळझाडे आदी बाबींचा मोबदला मिळणार आहे. गावठाणातील रहिवासी प्लॉटच्या बदल्यात तेवढाच प्लॉट नवीन ठिकाणी मिळणार आहे. बांधकाम झालेले घर आणि गोठ्याचे मूल्यांकन करून तेवढी रक्कम दिली जाणार असून प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नोकऱ्यात तीन टक्के आरक्षण आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणे फायदेशीर असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी यावेळी सांगितले. यादृष्टीने जनजागृतीसाठीच ९ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पांढरकवडा नगरपरिषदेच्या स्टेडियमवर मेळावा घेण्यात येत आहे. माजी मंत्री रामचंद्र रेड्डी हे या मेळाव्याचे अध्यक्ष राहतील. शिवाय सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. याप्रसंगी भारत राठोड, संतोष बोरेले उपस्थित होते. (वार्ताहर)