निवडणूक कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:25 IST2019-04-16T22:24:36+5:302019-04-16T22:25:06+5:30
निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

निवडणूक कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली. मंगळवारी याबाबत तहसीलदारामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन पाठविण्यात आले.
कर्तव्य पार पाडून परत येण्याकरिता वाहन सुविधा नसल्यामुळे कर्मचारी खासगी वाहनाने प्रवास करतात. रात्री उशिरा प्रवासादरम्यान घाटंजी येथील कृषी सहायक यांचा अपघाती मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. अशा घटना टाळण्यासाठी सुविधांमध्ये वाढ करावी, कर्मचाऱ्यांना लगतच्या तालुक्यातच निवडणूक काम द्यावे, निवडणूक साहित्य वाटप ठिकाणी भोजन व राहण्याची व्यवस्था करावी, कर्मचाऱ्यांना जाण्यायेण्याकरिता शासकीय वाहनाची सोय करावी, प्रकृती बिघडल्यास तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना, लिपीकवर्गीय संघटना कृषी अधिकारी तांत्रिक संघटना, विस्तार अधिकारी कृषी संघटना, सहायक लेखाधिकारी संघटना, ग्रामसेवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आदींच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.