प्रकल्प भरले, शहरातील पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 05:00 AM2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:00:13+5:30

गुरूवारी दुपारी निळोना प्रकल्प ४.५ एमएम क्युब अर्थात दशलक्ष घनमिटर पाणी साठ्याने ओव्हर फ्लो झाला आहे. या ठिकाणावरून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या ओव्हर फ्लोवर चापडोह प्रकल्पाच्या साठ्याचे गणित अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. चापडोह प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे हा प्रकल्प पाहिजे तसा भरला नाही. आता निळोना ओव्हर फ्लो झाल्याने लवकरच चापडोह प्रकल्प भरणार आहे.

Projects filled, city water concerns eased | प्रकल्प भरले, शहरातील पाण्याची चिंता मिटली

प्रकल्प भरले, शहरातील पाण्याची चिंता मिटली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरवासीयांची तहान भागविणारा निळोना प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर चापडोह प्रकल्प निम्मा भरला आहे. निळोना प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत सप्टेंबरपर्यंत राहला तर पुढील पावसाळ्यापर्यंतचे लागणारे पाणी सहज उपलब्ध होते. अन्यथा एप्रिल आणि मे महिन्यात इमर्जन्सी मोटरपंप प्रकल्पात सुरू करावे लागतात. यावर्षी प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने सध्यातरी यवतमाळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे वाढत्या शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
गुरूवारी दुपारी निळोना प्रकल्प ४.५ एमएम क्युब अर्थात दशलक्ष घनमिटर पाणी साठ्याने ओव्हर फ्लो झाला आहे. या ठिकाणावरून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या ओव्हर फ्लोवर चापडोह प्रकल्पाच्या साठ्याचे गणित अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. चापडोह प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे हा प्रकल्प पाहिजे तसा भरला नाही. आता निळोना ओव्हर फ्लो झाल्याने लवकरच चापडोह प्रकल्प भरणार आहे. या दोन्ही प्रकल्पावरून शहराला पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे शहरासाठी दोन्ही प्रकल्प महत्वाचे आहेत.
सध्या शहराला पाच दिवसआड पाणी पुरवठा होतो. शहराचे विभाजन पाच झोनमध्ये करण्यात आले आहे. त्यानूसारच पुढील काळात पाणी पुरवठयाचे नियोजन असणार आहे. शहरातील तीन लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी ४१ हजार नळजोडण्या झाल्या आहेत. आणि आणखी नळ जोडणीचे अर्ज आले आहेत.

वार्षिक सरासरीच्या  ६१ टक्के पाऊस 
- जिल्ह्यात जून महिन्यात १०७ टक्के पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात पावसाने मासिक सरासरी पूर्ण केली. आतापर्यंत ६१ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 
 

 

Web Title: Projects filled, city water concerns eased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.