शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्या उचलणार शासकीय योजनांचा भार

By admin | Updated: February 25, 2015 02:19 IST

जिल्हा परिषदेकडून गावपताळीवर अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक लाभार्थी केवळ निकषात बसत नाही म्हणून योजनेपासून वंचित राहतात.

यवतमाळ : जिल्हा परिषदेकडून गावपताळीवर अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक लाभार्थी केवळ निकषात बसत नाही म्हणून योजनेपासून वंचित राहतात. अशा व्यक्तीसाठी खासगी कंपन्याची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेऊन संयुक्त बैठक आयोजित केली आहे. जिल्ह्यात एसीसी सिमेंट, वेस्टर्न कोल लिमिटेड, एनसीसी, एल अ‍ॅन्ड टी, रिलायन्स फाऊडेन्शन, अ‍ॅप्रो या कंपन्याकडून स्वयंसेवी तत्वावर काम करतात. आता या कंपन्याच्या आर्थिक मदतीतून रखडलेल्या योजना पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष करून जलयुक्त शिवार अभियान, शौचालय निर्मिती, स्वच्छता अभियानासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. याच अनुषंगाने मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत खासगी कंपन्यासोबत संयुक्त बैठक झाली. २ मार्चला पुन्हा सर्व शासकीय यंत्रणाची संयुक्त बैठक घेण्यात येत आहे. खासगी कंपन्याच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबविला जाणार आहे. अनेकदा वैयक्तीक योजनेतील लाभार्थ्यांना शासन निकषामुळे काम पूर्ण करत येत नाही. घरकूलाचा हप्ता मिळविण्यासाठी काहींनी शौचलयाची अट पूर्ण केलेली नसते. अशा जुन्या लाभार्थ्यांना खासगी कंपन्यांकडून अर्थसहाय घेऊन त्याचे रखडलेले काम कसे पूर्ण करत येईल यावर विचार केला जात आहे. खासगी कंपन्यांनी अनेक गावात शुध्द पाण्याचे यशस्वी प्रकल्प सुरू केले आहेत. यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे मिनरल वॉटरचा प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू आहे. याच गावात खासगी कंपन्यांनी शंभरावर शेततळे खोदले आहेत. त्यांनी केवळ आमची कामे शासकीय योजनेतून झाली, असे दाखवू नका एवढ्याएकाच अटीवर सहकार्य करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आणखी शासकीय योजनांना गती मिळणार आहे. विशेष करून शौचालय निर्मितीची योजना, जलयुक्त शिवार अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)