शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदररोज कार्यशाळा : पुढील वर्षीच्या ‘पीसा’ परीक्षेची सज्जता, तज्ज्ञांद्वारे अध्यापनाचे ‘अपडेशन’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने एकीकडे शिक्षणाबाबत चिंता व्यक्त होत असताना जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील शिक्षक मात्र थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची सज्जता करीत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘पीसा’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेमके काय आणि कसे शिकवावे, याची तयारी केली जात आहे. अन् त्यांना मार्गदर्शन लाभतेय माजी शिक्षण सचिव व विद्यमान रोहयो विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचे!झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार असले, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात ते तरबेज व्हावे, पुढील वर्षी पीसा परीक्षेत बाजी मारून त्यांनी देशाचे नाव उंचवावे, यासाठी तयारी केली जात आहे. विविध गावातील शिक्षक दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ असे एकत्र येऊन हा उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे, खेड्यापाड्यातील या उपक्रमशील शिक्षकांना तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.‘पिसा’ म्हणजे नेमके काय ?जगभरातील कोणत्या देशाची शिक्षण व्यवस्था सध्या उत्तम आहे, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ ही संस्था पीसा (प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडेंट असेसमेंट) मूल्यांकन चाचणी घेत असते. त्यात जवळपास ८० देश भाग घेतात. दर तीन वर्षांतून होणाºया या परीक्षेत महाराष्ट्राने एकदाही भाग घेतला नाही. मात्र २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करण्याची तयारी तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सुरू केली होती. ती आता अधिक वेगाने सुरू आहे.आंतरराष्ट्रीय शिक्षणाची उद्गाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे अनुभव कथन करतात. शिवाय, प्रत्येक शिक्षकाला रोज स्वाध्याय दिला जातो, रोज त्यांना अहवाल वाचन करावा लागतो. त्यामुळे अध्यापनशैली अधिक विद्यार्थीभिमुख होण्याकडे वाटचाल सुरू आहे.- प्रकाश नगराळेगटशिक्षणाधिकारी, झरीजामणी

टॅग्स :Educationशिक्षण