पहिल्याच पावसात पालिकेच्या कारभाराची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:20+5:30

यवतमाळ शहराप्रमाणेच जिल्ह्यात ग्रामीण भागातही बहुतांश गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. यवतमाळ नजीकच्या हिवरी येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पांढरकवडा परिसरात ढगाळी वातावरणासह तुरळक पाऊस झाला. आर्णी तालुक्यातही दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. नेर तालुक्यात दुपारी ४.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. वणी तालुक्यात रिमझीम स्वरुपाचा पाऊस झाला. 

Polkhol of the administration of the municipality in the first rain | पहिल्याच पावसात पालिकेच्या कारभाराची पोलखोल

पहिल्याच पावसात पालिकेच्या कारभाराची पोलखोल

Next
ठळक मुद्देगटारी ओव्हर-फ्लो, अनेकांच्या घरात शिरले पाणी : जिल्ह्यात ६५ मिमी पावसाची नोंद, यवतमाळमध्ये घरांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी पहिल्याच पावसाने यवतमाळला झोडपले. सायंकाळी सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. चमेडियानगरसह लोखंडी पूल, सुराणा ले-आऊट, तलावफैल, उमरसरा आदी भागात नाल्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. या पावसाने पालिकेचे पोकळ नियोजनही उघडे पाडले. यवतमाळ शहर तसेच अर्जुना येथे वीज कोसळल्याने प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. 
मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ४ च्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे तासभर विजांच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू होता. 
मंगळवारी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान येथील वडगाव परिसरात वीज पडून एकाच मृत्यू झाला. तर दारव्हा रोड भागात हाॅटेलवरील टिनपत्रे उडून नुकसान झाले. पत्रकार काॅलनीतील झाड उन्मळून पडले. 
दुपारी चार वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास दीड तास हा पाऊस कोसळत होता. यावेळी विजांचाही जोरदार कडकडाट होत होता. सोमवारीपासून बाजारपेठेवरील निर्बंध हटल्याने बाजारपेठेत नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ असतानाच अचानक पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून ४० अंशाच्या आसपास तापमान पोहोचलेले असताना मंगळवारच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.
यवतमाळ शहराप्रमाणेच जिल्ह्यात ग्रामीण भागातही बहुतांश गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. यवतमाळ नजीकच्या हिवरी येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पांढरकवडा परिसरात ढगाळी वातावरणासह तुरळक पाऊस झाला. आर्णी तालुक्यातही दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. नेर तालुक्यात दुपारी ४.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. वणी तालुक्यात रिमझीम स्वरुपाचा पाऊस झाला. 
तर मारेगाव तालुक्यात दुपारपासून अधून-मधून पाऊस बरसत होता. मार्डीतही चांगला पाऊस झाला. महागाव तालुक्यात गेले दोन दिवस पाऊस लावत आहे. मंगळवारी दुपारपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. दोन ते आठ जून या काळात महागाव तालुक्यात ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  तर पुसद, उमरखेड, दारव्हा आदी ठिकाणी दिवसभर ढगाळी वातावरण कायम होते. मात्र दारव्हा तालुक्यातील बोरीअरब गावात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. डोंगरखर्डा येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाला असून पेरण्यांची लगबगही सुरू झाली आहे. बुधवारपासून पेरण्या सुरू करण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्यासाठी मंगळवारी यवतमाळच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी अनेकांनी धाव घेतल्याच पाहायला मिळाले.

वडगावात दोन ठिकाणी वीज पडली
मंगळवारी दुपारी यवतमाळ शहरात सोसायट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला. वडगाव परिसरात एकाच वेळी दोन ठिकाणी वीज कोसळली. पिंपळाच्या झाडाखाली आश्रय घेतलेला गजानन किसन घाडे (३५) हा युवक ठार झाला. त्याचा सहकारी जखमी आहे. याच वेळेत वडगावातील संजय जुमळे यांच्या घरावर वीज पडून स्लॅबला भगदाड पडले.  सुदैवाने कुठलीही जीवित हानी किंवा इजा झाली नाही. शरद शिवारातही वीज पडून सुखदेव कोळझरे यांचा मृत्यू झाला. 

चमेडियानगर, सुराणा ले-आऊटमध्ये पाणी शिरले 
- यवतमाळ नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सखल भागातील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. यामध्ये चमेडियानगर, बेंडकीपुरा, लोखंडी पूल, सुराणा ले-आऊट, तलावफैल, उमरसरा या भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. यात नागरिकांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 
- उमरसरा भागात ले-आऊटचे काम सुरू आहे. याच्या खालील भागात नागरिकांची वस्ती आहे. त्या ठिकाणी सुरक्षा भिंत नसल्याने मुरुम आणि पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यात मोठे नुकसान झाले. यवतमाळ नगरपरिषदेने नाल्यांचा उपसा न केल्याने जागोजागी पाणी थांबले होते. पुरामध्ये शहरातील कॅरिबॅग थमाॅकोल, औषधीचा कचरा वाहून थेट नागरिकांच्या घरात शिरला. तर काही पुलांमध्ये अडकला. यामुळे घरात पाणी शिरुन अन्नधान्यासह इतर साहित्याचे नुकसान झाले. 
 

Web Title: Polkhol of the administration of the municipality in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस