शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वेदनेने विव्हळणाऱ्या वृद्धाला पोलीस अधीक्षकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST

त्या वृद्धाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याने शनिवारी ११ एप्रिलला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी या आजारावर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून यवतमाळ सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाहन व पैसा नसल्याने या रुग्णाने पायदळ यवतमाळ गाठले. हे ऐकून जगदीश राठोड याने त्या वृद्धाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार शहरात पेट्रोलिंग करीत असताना वनवासी मारोती परिसरात एका वृद्धाने आर्त हाक दिली. हा आवाज ऐकून एसपी थांबले. त्यांनी रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या या वृद्धाची आस्थेने चौकशी केली व पुढे निघतानाच त्यांनी तेथे असलेल्या शिपायाला तातडीने योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले.किशना उकांजी टोंगले (६०) रा. झिरपूरवाडी ता. दिग्रस हा वृद्ध सलग दोन दिवसांपासून दिग्रस येथून पोटदुखीची वेदना घेऊन पायदळ निघाला. या प्रवासात त्याला अन्नाचा कणही मिळाला नाही. उपाशी पोटी मजल दरमजल करीत यवतमाळ शहर गाठले. वनवासी मारोती परिसरात त्याच्या शरीरात त्राणही उरले नव्हते. तो रस्त्याच्या कडेला पडला. इतक्यात पोलिसांचे वाहन रस्त्यावरून जाताना दिसले. प्राण एकवटून त्याने मदतीसाठी हाक मारली. ही हाक ऐकून पोलीस अधीक्षकांनी त्याला मदत करण्याचे निर्देश दिले. शहर ठाण्यातील बीट मार्शल जगदीश राठोड हा तेथे होता. त्याने तत्काळ त्या वृद्धाला जवळ घेऊन जेवण व पाणी दिले. नंतर आस्थेने विचारपूस केली असता धक्कादायक वास्तव ऐकायला मिळाले. त्या वृद्धाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याने शनिवारी ११ एप्रिलला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी या आजारावर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून यवतमाळ सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाहन व पैसा नसल्याने या रुग्णाने पायदळ यवतमाळ गाठले. हे ऐकून जगदीश राठोड याने त्या वृद्धाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. काही मदत लागल्यास त्याबाबतही संपर्काची सोय करून दिली.

टॅग्स :Policeपोलिस