शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो विषप्रयोग’ प्रेमसंबंधातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

गोदणी मार्गावर कँटीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग रामदास ईश्वर दहीकर (४७) याचा पत्नीनेच विषप्रयोग करून खून केला. या घटनेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अवधुतवाडी पोलीस तपासाच्या दिशेने असतानाच टोळी विरोधी पथकाने आरोपी महिलेला अटक केली. या गुन्ह्याचा तपास अवधुतवाडी पोलीस नव्याने करत आहे. त्यामध्ये प्रेमसंबंधातून खून झाल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देप्रियकराला अटक : अवधुतवाडी पोलिसांनी उलगडली दुसरी बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात दिव्यांग पती अडसर ठरत असल्याने पत्नीने विषप्रयोग करत त्याला ठार केले. इतकेच नव्हे तर एक महिन्यापासून पतीची शारीरिक प्रकृती कमजोर करण्यासाठी त्याला अतिसाराच्या गोळ्या दिल्या जात होत्या, ही माहिती प्रियकराने अवधुतवाडी पोलिसांसमोर कबूल केली. या खुनाच्या गुन्ह्याला वेगळेच वळण असल्याचा प्रकार उघड झाला आहे.गोदणी मार्गावर कँटीन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग रामदास ईश्वर दहीकर (४७) याचा पत्नीनेच विषप्रयोग करून खून केला. या घटनेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अवधुतवाडी पोलीस तपासाच्या दिशेने असतानाच टोळी विरोधी पथकाने आरोपी महिलेला अटक केली. या गुन्ह्याचा तपास अवधुतवाडी पोलीस नव्याने करत आहे. त्यामध्ये प्रेमसंबंधातून खून झाल्याचे पुढे आले आहे. दिव्यांग असलेला रामदास हा आकाशवाणी केंद्राजवळ कँटीन चालवित होता. तो आई, वडीलांसह गुरुनानकनगरस्थित घरी राहात होता. डिसेंबर २०१९ मध्ये सुनेचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय सासूला आला. त्यावरून रामदास व त्याच्या पत्नीत वाद झाला. नंतर हे प्रकरण निवळले. रामदासला आई-वडिलांपासून दूर काढून प्रियकर राहात असलेल्या जामनकरनगर परिसरात भाड्याची खोली केली. तेथे डबा पोहोचविण्याच्या नावाखाली ती महिला प्रियकर अजय शंकर चित्तलवार (२५) रा.भटाळी जि.चंद्रपूर याच्या सतत संपर्कात होती.अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर यांच्या मार्गदर्शनात फौजदार सुयोग महापुरे, जमादार सतीश चौधरी, नरेंद्र बगमारे, समाधान कांबळे, बबलू चव्हाण यांनी गुन्ह्याचा तपास करत रेकॉर्डवर नसलेल्या प्रियकर अजय चित्तलवार याला अटक केली. त्याच्या कबुलीतून या खुनाच्या घटनेची दुसरी बाजू पुढे आली. त्या महिलेने आपल्या १० व १२ वर्षांच्या मुलांची पर्वा न करता पतीला संपविले. पोलिसांच्या सतर्कतेने या अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेल्या गुन्ह्याचा भंडाफोड झाला.नैसर्गिक मृत्यूचा देखावा, अतिसाराच्या गोळ्याप्रेम बहरात आले असताना रामदास पत्नीला अडचणीचा वाटू लागला. त्याला संपविण्यासाठी व नैसर्गिक मृत्यू दाखविण्यासाठी एक महिन्यापासून अतिसाराच्या गोळ्या दिल्या जात होत्या. यामुळे रामदासची प्रकृती खालावली. मात्र तो जीवानिशी ठार झाल नाही. अखेर कृषी केंद्रातून किटकनाशक खरेदी करून शीतपेयातून ते रामदासला पाजण्यात आले. २१ एप्रिलला विषप्रयोग करून त्याला ठार केले. यावेळी प्रत्येक क्षणाला रामदासची पत्नी प्रियकर अजय चित्तलवार याच्या संपर्कात होती.

टॅग्स :Murderखून