जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण

By Admin | Updated: July 30, 2016 01:01 IST2016-07-30T01:01:15+5:302016-07-30T01:01:15+5:30

वनमहोत्सव २०१६ अंतर्गत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Plantation at Jawaharlal Darda Engineering College | जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण

यवतमाळ : वनमहोत्सव २०१६ अंतर्गत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, प्रा. पंकज पंडित, प्रा. संदीप सोनी, प्रा. उमेश कावरे, प्रा. सचिन अस्वार, रविन सिंग, हरिश टांक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. पायल पावडे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. जिरापुरे, प्रा. विद्याशेखर, प्रा. विशाल राठोड, प्रा. दीपक उबरहांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: Plantation at Jawaharlal Darda Engineering College