शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पुरातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते.  जवळचा नाला दुथडी भरून वाहात होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंब नाल्यापलीकडे वास्तव्यास गेले. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद्याप त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसाळ्यात व नाल्याला पूर असताना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी पुरातून येथील महिला पायपीट करतात.

ठळक मुद्देमहागाव तालुक्यातील वाकान येथील नागरिकांचा जीव मुठीतनाल्याच्या काठावरील कुटुंबे १५ वर्षांपासून उपेक्षितचअंत्यसंस्कारासाठी करावी लागते पूर ओसरण्याची प्रतीक्षा

ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील वाकानवासीयांचा वनवास संपता संपत नाही. ऐन पावसाळ्यात या गावातील महिला व नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पुरातून पायपीट करावी लागत आहे.२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते.  जवळचा नाला दुथडी भरून वाहात होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंब नाल्यापलीकडे वास्तव्यास गेले. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद्याप त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसाळ्यात व नाल्याला पूर असताना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी पुरातून येथील महिला पायपीट करतात.या गावात ९ जुलै २००५ रोजी दूध गंगा नदीला आलेल्या महापुराने होत्याचं नव्हतं करून टाकलं. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबांची वाताहात झाली. एका रात्रीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. त्यात ७१ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही १७ वर्षानंतर प्रलंबित आहे. महापुराच्या तांडवानंतर काहींनी गावाच्या दुसऱ्या टोकाला धावपळनगर म्हणून वसाहत स्थापन केली. तेथे ३० ते ३५ घरे आहे. त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही. आजही तेथे पाणी उपलब्ध नाही. गुंडभर पाण्यासाठी महिलांना नदीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. 

मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची अनास्था कायमच

या मतदारसंघांमध्ये अनेक अनेक दिग्गज राजकारणी आहेत. महत्वाची पदेही  या भागाला मिळाली मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे  पूरग्रस्त सुविधांपासून वंचित राहिले. स्थानिक नेत्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिली. प्रत्येक निवडणुकीत मत मागितले. मात्र, पुनर्वसन अधांतरीच लटकले. किमान आता तरी  तात्काळ उपाययोजना करून नागरिकांची हेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावात जर कुणाचं निधन झालं तर अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पलीकडे पुराच्या पाण्यातून जावे लागते. जास्त पाणी असल्यास पुराचे पाणी उतरण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या नाल्यावर पुलाची आवश्यकता असल्याचे सरपंच अश्वजीत भगत यांनी सांगितले.

 

टॅग्स :floodपूरwater scarcityपाणी टंचाई