शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगीच्या लखूला मुंबईत अटक

By admin | Updated: January 28, 2016 02:30 IST

फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात महागाव पोलिसांनी ...

२७ लाखांच्या चोरीतील संशयित : महागाव पोलिसांची कारवाई
महागाव : फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात महागाव पोलिसांनी एका आरोपीला मुंबईतून अटक केली. अटकेतील आरोपी हा मूळ फुलसावंगी येथीलच रहिवासी आहे.
फुलसावंगी येथील संदेश मुत्तेपवार यांच्या घरी ८ जानेवारी रोजी धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी २७ लाख रुपये रोख आणि दोन तोळे सोने लंपास केले होते. तसेच तेवढीच रक्कम घटनास्थळी आढळून आली होती. त्यामुळे चोरटे गावातीलच असावे, असा कयास सुरुवातीपासून पोलिसांचा होता. संशयित असलेल्या आरोपींचा शोध महागाव पोलिसांनी सुरू केला होता.
ठाणेदार प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार गोसावी यांचे पथक मुंबईत गेल्या १५ दिवसांपासून तळ ठोकून होते. अखेर ठाणेदार गोसावी यांनी आरोपी आयाजोद्दीन ऊर्फ लखू आयसोद्दीन नबाब (२०) याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्याला घेऊन पथक महागावात पोहोचले. बुधवारी सकाळी महागाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. महागाव पोलीस त्याची कसून चौकशी करीत असून या चोरीत आणखी कोण-कोण आहे याचा तपासही सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)