शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगावात पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री

By admin | Updated: November 10, 2016 01:41 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट स्वीकारणे आज पूर्णत: टाळले गेले.

नोटा बंद : नागरिकांना विविध अडचणीबाभूळगाव : पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट स्वीकारणे आज पूर्णत: टाळले गेले. या नोटांचा व्यवहार अपवादानेच झाला. पेट्रोलपंपावर या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर झाल्यानंतरही नाकारले गेल्याने पोलीस बंदोबस्तात पेट्रोल विक्री करावी लागली. १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला. कुठल्याही वस्तूसाठी ५०० रुपयांची नोट दिली जात होती. परंतु ही नोट स्वीकारण्याचे टाळले. याच बाबीचा अनुभव पेट्रोलपंपावर आला. किमान चारशे रुपयांचे पेट्रोल घेण्याची जणू सक्ती करण्यात आली. त्यामुळे वादाच्या किरकोळ घटना याठिकाणी घडल्या. अखेर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पंपावर दाखल होऊन पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. येथील बसस्थानकावरही वाहकांकडून ५०० रुपयांची नोट बंद झाल्याचे सांगून प्रवाशांना वेठीस धरण्यात आले. ऐवढेच नव्हे तर बसमधून खाली उतरविण्याचा प्रकारही घडला. पुढील प्रवासासाठी ५०० रुपयांची चिल्लर मिळावी यासाठी भटकणाऱ्यांना या नोटेचे ३०० रुपये देणारेही तेथे हजर असल्याने पिळवणुकीचे प्रकार घडले. हजार रुपयांच्या मोबदल्यात ७०० रुपये देण्याचा प्रकारही याठिकाणी काही भागात घडला. व्यवहार करताना नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. काही व्यावसायीकांनी मात्र या नोटा स्विकारल्या. या निर्णयाविषयी समाधानही व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)