शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शिंगाडा पिकावर किडीचे आक्रमण

By admin | Updated: April 10, 2015 00:15 IST

येथील ब्रिटीशकालीन तलावातील शिंगाड्यावर अज्ञात किडीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शिंगाडा उत्पादक चिंतेत सापडले आहे.

मुकुटबन : येथील ब्रिटीशकालीन तलावातील शिंगाड्यावर अज्ञात किडीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शिंगाडा उत्पादक चिंतेत सापडले आहे.शिंगाडा पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्यानंतर नऊ ते १० वेळा फवारणी करण्यात आल. मात्र ती कीड अद्यापही नियंत्रणात आली नाही. मार्च महिन्यात शिंगाडा पिकाचे तलावात बिजारोपण करण्यात आले. जून ते आॅगस्टपर्यंत शिंगाड्याचे चांगले पीक येते. आजूबाजूच्या परिसरात शिंगाड्याचे कोठेही उत्पन्न होत नसल्याने येथील शिंगाड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र अज्ञात किडीच्या आगमनामुळे शिंगाड्याचे पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे वेल तलावाबाहेर काढून त्याचे ढिग लावण्यात येत आहे. परिणामी तलाव परिसरात वेलीचे ढिग दिसून येत आहे. त्याचबरोबर मासोळीचेही उत्पादन याच तलावात घेतले जाते. तथापि यावर्षी त्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाल्याने मासोळी उत्पन्नात अद्याप पाहिजे तशी वाढ झाली नाही. या तलावातील उत्पन्नाच्या भरवशावर अनेक भोई बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र शिंगाडा व मासोळीच्या उत्पन्नात घट झाल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे. मध्यंतरी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्याने तलावात सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. याच परिसरात आठवडी बाजार व मच्छी मार्केट आहे. त्यामुळे शिंगाडा व मासोळी विक्रीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र शिंगाडा पिकावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. पाण्यात नाव घेऊन शिंगाड्याची लागवड करणे, फवारणी करणे, शिंगाडा काढणे, त्याला मोठ्या कैचिने कापणे व नंतर गरम पाण्यात उकळून शिजविणे, या प्रक्रियेतून गेल्यानंतर शिंगाडा बाजारात येत असतो. (शहर प्रतिनिधी)