एसटी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:28+5:30

मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे.

Pay the overdue amount to ST employees | एसटी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम द्या

एसटी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम द्या

Next
ठळक मुद्देकामगार संघटना : आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन काळात एसटीचे उत्पन्न कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना मार्च आणि मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि डिझेल खर्च भागविणे कठीण होऊन बसले आहे. राज्य शासनाने सवलतमूल्यापोटी प्रतीपूर्तीची रक्कम दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांना माहे मार्च देय एप्रिलचे ७५ टक्के, माहे एप्रिल देय मेचे १०० टक्के आणि माहे मे देय जून २०२० चे ५० टक्के वेतन देण्यात आले. जून देय जुलैचे वेतन वाटपास येणारी आर्थिक अडचण दूर करून पूर्ण वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. तसे पत्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले, अशी माहिती विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी दिली.

तीन राज्यात शासनाकडून आर्थिक सहाय्य
लॉकडाऊन संपूर्ण देशात आहे. ही वस्तूस्थिती असली तरी उत्तर प्रदेश, कर्नाटक व तेलंगाणा राज्यात तेथील एसटी महामंडळ कर्मचाºयांसाठी शासनाने आर्थिक सहाय्य केले. या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठीही शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, असे संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Pay the overdue amount to ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.