शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुसद नगरपरिषद समिती सभापतींची निवड अविरोध

By admin | Updated: January 13, 2017 01:34 IST

येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे यांची निवड झाली असून बांधकाम सभापतीपदी

कार्यकर्त्यांचा जल्लोष : पाणीपुरवठा चौथ्यांदा राजू दुधे यांच्याकडे
पुसद : येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे यांची निवड झाली असून बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी शहर आघाडीच्या साबेराबी जकी अन्वर यांची गुरुवारी निवड करण्यात आली.
पुसद नगरपरिषदेत सभापती व विषय समित्यांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी नियोजन सदस्य पदी राजेश साळुंके (राष्ट्रवादी), डॉ. मोहंमद नदीम (राष्ट्रवादी विकास आघाडी) व निरज पवार (भाजपा) यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी साबेराबी जकी अन्वर, शिक्षण समिती सभापती शेख फिरोज अफसर, आरोग्य सभापतीपदी अ‍ॅड. भारत जाधव, पाणीपुरवठा सभापतीपदी चौथ्यांदा राजू दुधे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दीपाली धुळे व नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेला नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, प्रशासन अधिकारी उत्तमराव डुकरे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सभापती निवडीच्या वेळी सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सभापतींची निवड पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)

उमरखेडमध्ये भाजपा-सेनेचे वर्चस्व
उमरखेड - येथील नगरपरिषदेच्या सभापती व विषय समित्यांची निवड गुरुवारी अविरोध पार पडली. या समित्यांवर भाजपा-शिवसेनेचे वर्चस्व राहिले. बांधकाम समिती सभापतीपदी बाळासाहेब केशवराव नाईक, शिक्षण समिती सभापतीपदी प्रकाश दुधेवार, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संदीप ठाकरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी दिलीप सुरते, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी अरविंद भोयर आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनुप्रिता देव यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष नामदेव ससाने स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असून या समितीत उपाध्यक्ष अरविंद भोयर, बाळासाहेब नाईक, दिलीप सुरते, प्रकाश दुधेवार, अनुप्रिता देव, संदीप ठाकरे, अमोल तिवरंगकर, नितीनकुमार भुतडा, अविनाश अग्रवाल यांची निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेत निवड सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी सहायक म्हणून काम पाहिले. यावेळी माजी आमदार उत्तमराव इंगळे, गजेंद्र ठाकरे, रेखा गवळे, कविता खंदारे, ज्योती इंगळे, सरिता पाचकोरे उपस्थित होते. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त केला. सभापतींच्या निवडीच्या वेळी नगरसेवकांसह अनेक समर्थकही उपस्थित होते. आजच्या निवडीवर शिवसेना आणि भाजपाचे वर्चस्व दिसून आले.