शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण घटले; मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा चढउतार : २८८ पाॅझिटिव्ह, १३ बळी, ४४३ बरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. दरदिवशी हजारावर रुग्ण सापडत असताना आता ही संख्या तीनशेच्या खाली आली आहे. शनिवारी दिवसभरात केवळ २८८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. मात्र रुग्ण घटत असले तरी मृत्यूचे आकडे कायम आहेत. शनिवारीही १३ जणांचा बळी गेला. तर ४४३ जण कोरोनामुक्तही झाले.शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, तर खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले. मेडिकलमध्ये दगावलेल्यांमध्ये नेर येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दारव्हा येथील २६, ६२ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ५७, ७० वर्षीय पुरुष, घाटंजी येथील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ८२ वर्षीय महिला आणि वणी येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात पांढरकवडा येथील ६० वर्षीय पुरुष व घाटंजी येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.  शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या २८८ जणांमध्ये १७१ पुरुष आणि ११७ महिला आहेत. यात यवतमाळ येथील २५ रुग्ण, आर्णी ३७, बाभूळगाव ११, दारव्हा २५, दिग्रस १७, घाटंजी १३, कळंब ८, महागाव ३, मारेगाव १६, नेर २१, पांढरवकडा २४, पुसद ४, राळेगाव १०, उमरखेड ५, वणी ३४, झरीजामणी २९ आणि इतर शहरातील ६ रुग्ण आहे. 

एकूण बळीसंख्या १७०० जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, शनिवारी एकूण ६८९४ अहवाल आले. यापैकी २८८ पॉझिटिव्ह तर ६६०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या