शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देआगारांचेही दररोज १२ लाख रुपयांचे नुकसान; बिनपगारीमुळे यंत्रणा त्रस्त

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा फटका लोकवाहिनीला बसला आहे. अजूनही अनेक गावांसाठी बसफेऱ्या नाहीत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत हा अनुभव आहे. याचा परिणाम वाहक आणि चालकांवर काही प्रमाणात होत आहे. ड्यूटी लागत नसल्याने त्यांची गैरहजेरी लागते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच अनेक कामगारांचे वेतन कमी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना मोठी सर्कस करावी लागते. अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते. कोरोनापूर्वी ४५ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत होते. आता ३३ लाख उत्पन्न मिळत असल्याने महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्पन्न वाढण्याच्यादृष्टीने पूर्ण क्षमतेने वाहतूक होणे गरजेचे आहे.

रजा घेण्यासाठी कामगारांवर जोरकोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी बसफेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी काही कामगारांना रजा घेण्यास भाग पाडले जाते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब कामगार संघटना ठासून सांगत असली तरी महामंडळाचे अधिकारी मात्र या बाबीला नकार देत आहे. प्रत्येक कामगाराला दररोज ड्यूटी मिळतेच, असे सांगितले जाते.

जिल्ह्यात बसचे उत्पन्न ४५ ऐवजी ३३ लाखमागील नऊ महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नाची बाजू कमकुवत झाली आहे. पूर्ण लाॅकडाऊन असताना एसटीची चाके थांबली होती. यानंतर काही क्षमतेने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली. या काळात मोठा आर्थिक दणका एसटीला बसला. आताही दररोज १२ लाख रुपये कमी उत्पन्न महामंडळाला मिळते.

हजेरी भरली जावीचालक-वाहक कामगिरीवर येतात. मात्र, काही लोकांना स्पेअरमध्ये ठेवले जाते. कामगिरी नसल्यास परत पाठविले जाते. अशावेळी त्यांना रजा घ्यावी लागते. त्यांचे आर्थिक नुकसान होते. महामंडळाने कामावर हजर झालेल्या कामगारांची हजेरी भरून द्यावी.- राहुल धार्मिक, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

पूर्ण क्षमतेने वाहतूकयवतमाळ आगारातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. सोबतच माल वाहतूक करण्यासाठीही कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे यवतमाळ आगारात सर्वच चालक-वाहकांना कामगिरी दिली जाते. ग्रामीण भागातील सर्वच मार्गांवरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.- विवेक बनसोड, आगार प्रमुख, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी