शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा

By admin | Updated: August 17, 2016 01:08 IST

शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यापूर्वी शाळेत कुणीही तंबाखू सेवन करीत नाही ना, याची खातरजमा करावी. नवीन पिढीला तंबाखूमुक्त निरोगी ...

संजय राठोड : ठिकठिकाणच्या ग्रामसभेत तंबाखूमुक्तीचा ठराव यवतमाळ : शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यापूर्वी शाळेत कुणीही तंबाखू सेवन करीत नाही ना, याची खातरजमा करावी. नवीन पिढीला तंबाखूमुक्त निरोगी वातावरण देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. पालकांनीही तंबाखू सेवनावर पैसे खर्च न करता मुलांसाठी बचत करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी अर्जुना येथील कार्यक्रमात केले. सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या ग्रामसभांमध्ये तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घेण्यात आला. तसेच गावातील शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचा ठरावही घेण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत अर्जुना येथे या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद, अर्जुना ग्रामपंचायत, सलाम मुंबई फाऊंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल्सच्या संयुक्त विद्यमाने अर्जुना ग्रामपंचायतीत तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प हा उपक्रम घेण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपसभापती नारायण राठोड, गटशिक्षणाधिकारी वासूदेव डायरे, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. अर्जुना शाळेच्या विद्यार्थिनींनी पालकमंत्र्यांना राखी बांधून तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्याचे वचन घेतले. येत्या बालदिनापर्यंत यवतमाळला देशातील पहिला तंबाखूमुक्त जिल्हा घोषित करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. तर शाळेच्या १०० यार्ड परिसरातील तंबाखूविक्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. खासदार गवळी म्हणाल्या, सीमेवर जवान आपल्या रक्षणासाठी प्राण पणाला लावत असतील तर आपण साधा तंबाखू का सोडू शकत नाही? जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त झालेल्या भित्तीचित्र स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिळणकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे व तालुका समन्वयक कैलास गव्हाणकर यांनी केले. तालुका समन्वयक नरेंद्र भांडारकर यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी) शाळांचा होणार गौरव अर्जुना येथील सरपंच व्यवहारे आणि उपसरपंच सुरोशे यांनी तंबाखू सेवन न करण्याची आणि गावालाही तंबाखूमुक्त बनविण्याची शपथ घेतली. तंबाखूमुक्त झालेल्या हिवरी केंद्रातील शाळांना शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच तंबाखूमुक्त शाळांना डिसेंबर महिन्यात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे काम सुरू आहे.