जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. ...
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ...
शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी म ...
येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता. ...
येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...
हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. ...
शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही. ...
नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने शहरातील पथदिवे बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत शहरात सहा हजार ५४४ पथदिवे बदलवून तेथे नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी लाईट लावण्यात आले. संपूर्ण शहरात २३ हजार ४५७ लाईट लावले जाणार आहे. ...
येथील कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी घोटाळा लवकरच सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) दरबारात दाखल होणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...