ऑनलाईन सभेला विरोध कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:06+5:30

सर्वसाधारण सभेत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मालमत्ता करावर कोविड काळात आकारलेला दंड माफ केला जावा, त्याला सभेची मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. नगरसेवकांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा विषय नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी ठेवला आहे.

Opposition to online meetings forever | ऑनलाईन सभेला विरोध कायमच

ऑनलाईन सभेला विरोध कायमच

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : आज सर्वसाधारण सभा, ऑनलाईन सभेत प्रश्न मांडता येत नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन आयोजित केली आहे. सकाळी ११ वाजता ही सभा आहे. मात्र मागच्या ऑनलाईन सभेचा अनुभव बघता नगरसेवकांनी या ऑनलाईन सभेला विरोध दर्शविला आहे. ऑनलाईन सभेत कोणत्याच विषयावर चर्चा होत असून पालिका सभागृहात फिजिकल अंतर राखून सभा घेणे शक्य असल्याची भूमिका नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्यापुढे मांडली.
सर्वसाधारण सभेत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मालमत्ता करावर कोविड काळात आकारलेला दंड माफ केला जावा, त्याला सभेची मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. नगरसेवकांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा विषय नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी ठेवला आहे. अमृत योजनेतील सांडपाण्यावर प्रक्रिया प्लांटला वन हद्दीत ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव, कोविडच्या उपाययोजनांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता, शिवाजीनगर येथील उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नाव देण्याचा विषय सभेत आहे.
याशिवाय विविध चौक, रस्त्यांचे नामकरण, खुल्या भूखंडातील १० टक्के जागा विविध संस्था, मंदिरे यांना देण्याचा प्रस्ताव सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. एकूण १७ विषयांवर ही ऑनलाईन सभा होणार आहे. मात्र ऑनलाईन सभेत नगरसेवकांना आपली बाजू मांडता येत नाही. लिंकची अडचण येते. त्यामुळे ही सभा नेहमीप्रमाणे सभागृहातच घेतली जावी, अशी आग्रही भूमिका भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पालिकेत पुरेशी जागा उपलब्ध असल्याचा दावा
नगरपरिषदेतील सदस्य संख्या पाहता पुरेसी जागा पालिकेत उपलब्ध आहे. फिजिकल डिस्टसिंग राखून सभेचे कामकाज करणे शक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन सभा रद्द करून नियमित सभा घेण्यात यावी, अशी मागणी भाजप गटनेते विजय खडसे, बांधकाम सभापती मनीष दुबे, आरोग्य सभापती मनोज मुधोळकर, प्रा.डॉ. अमोल देशमुख, शुभांगी हातगावकर, पुष्पा ब्राम्हणकर, रिता धावतोडे, लता ठोंबरे, साधना काळे आदींनी केली आहे.

Web Title: Opposition to online meetings forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.