शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष कामांचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रस्त्याची कामे करताना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे याचे गांभीर्य संबंधित विभागाला नसावे, याविषयी आश्चर्य ...

ठळक मुद्देतीन महिन्यात ‘वाट’ : वाहतुकीसाठी तारेवरची कसरत, नैसर्गिक दबाई न होता रस्त्याची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्याची कामे करताना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे याचे गांभीर्य संबंधित विभागाला नसावे, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते दबले गेले आहे. या खड्ड्यांचा पसारा आठ ते दहा फूट झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्याची नैसर्गिक दबाई झाल्यानंतर काम अपेक्षित होते.शहराच्या अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने तीन महिन्यांपूर्वी काही भागात रस्त्याचे डांबरीकरण केले गेले. मार्इंदे चौक ते वीर वामनराव चौक, वीर वामनराव चौक ते दाते कॉलेज रोड, वाघापूर-लोहारा बायपास रोडवरील वैभवनगर यासह नव्याने पाईप लाईन टाकलेल्या भागात झालेल्या रस्त्यांची स्थिती आज दयनीय आहे. या रस्त्यांची कामे झालेल्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे मोठमोठ्या पाईपलाईन टाकण्यात आल्या. निघालेला मलबा टाकूनच रस्ते बुजविले गेले. योग्यरित्या दबाई झाली नाही. तेथून अवघ्या काही दिवसातच या भागात रस्त्याची कामे उरकण्यात आली.नवीन रस्ता झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला. काम झाल्यापासून अवघ्या काही महिन्यात डांबरी रस्ते दबले. अर्धा फूट खोल, पाच ते सहा फूट रूंद अशा खड्ड्यांमुळे मार्ग काढण्याचा प्रश्न लोकांपुढे निर्माण झाला आहे. वास्तविक डांबरीकरण करताना मूळ रस्त्याची योग्यरित्या दबाई होणे अपेक्षित होते. परंतु रस्ते चकाचक करण्याची घाई झालेल्या संबंधित विभागाने या कामांवर लाखो रुपयांचा चुराडा केला. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या पाईपलाही धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्ते सतत वर्दळीचे आहेत.पाईपचे बेंड मुख्य चौकातपाण्याची पाईपलाईन वळविताना बेंड मुख्य चौकात बसविले गेले आहे. याठिकाणी मजबूत काम झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र रस्ते दबल्यामुळे या बेंडलाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने संबंधितांनी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.विश्रामगृह रस्त्यावर कृत्रिम नालीजिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कृषी विभागाकडे जाणाºया वळणावर कृत्रिम नाली तयार झाली आहे. याठिकाणी रस्त्याचे आडवे खोदकाम करून पाईप टाकण्यात आले. रस्त्याची योग्य किंवा नैसर्गिक दबाई न होता डांबरीकरण करण्यात आले. आता हा संपूर्ण ७० ते ८० फुटांचा रस्ता दबला गेला. त्याठिकाणी मोठी नाली तयार झाली आहे. तीन फूट रूंद आणि अर्धा फूट खोल या नालीतून मार्ग काढताना शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक