शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची मदत केवळ १३६ रुपये !

By admin | Updated: September 18, 2014 00:07 IST

पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे.

यवतमाळ : पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून शेतकरी संतप्त झाले असून अनेकांनी पीक विम्याची मदत शासनाला परत करण्याची तयारी चालविली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पीक विमा उतरविला होता. या मोबदल्यात कंपनीने पिकाच्या संरक्षणाची हमी दिली होती. जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी झाली. प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळतीच केली नव्हती. १० सप्टेंबर रोजी पीक विमा कंपनीने मदतीची पहिली यादी जाहीर केली आणि शेतकऱ्यांना जबर धक्का बसला. या यादीत हेक्टरी ५०० रुपये हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ १३६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. जाहीर झालेली ही मदत शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. जिल्ह्यात ८६ हजार शेतकऱ्यांना ३० कोटी रुपये देण्यात आले. १३६ रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत लागलेल्या याद्या पाहण्यासाठी शेतकरी येत आहे. मात्र मदतीचा आकडा पाहून गावी जाण्यायेण्याची तिकीटही निघत नसल्याचे दिसत आहे.(शहर वार्ताहर)