शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 11:43 IST

लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली.

यवतमाळ: घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातच वृद्ध आईवडील आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. यातच पाचवा लॉकडाऊन घोषित झाल्याचे वृत्त येताच, खचलेल्या सुनील टेकाम (वय 35 वर्षे) रा. नरसाळा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील नरसाळा येथील टेकाम कुटुंबीयसुद्धा गेल्या अडीच महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने त्रस्त होते रोज मजुरी करून  या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु मार्च महिन्यात कोरोनाने  देश लॉकडाऊन झाला आणि पोट भरण्याचा प्रश्न आवासून समोर आला. सुरवातीला अनेक समाजसेवकांनी मदतीचे हात पुढे केले. परंतु हळूहळू मदतीचे हे हात लुप्त व्हायला लागले. आता आईवडील आणि मुलांना सांभाळायचं कस, हा न सुटणारा प्रश्न सुनीलला उपाशीपोटी अस्वस्थ करीत होता. लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर  पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. राज्यात दररोज वाढणारा कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता कुटुंबाची वाताहात होणार, या विचाराने तो अस्वस्थ झाला. आणि त्याने अखेर आत्महत्येचा निर्णय घेतला. ३१ मे रोजी पाच वाजताच्या दरम्यान, मी गिट्टी खदाणीवर काम शोधून येतो, असे कुटुंबियांना सांगून त्याने घर सोडले आणि नामदेव दुर्गे या शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे  वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuicideआत्महत्याYavatmalयवतमाळ