वणी जवळील अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:36 IST2020-01-08T20:35:31+5:302020-01-08T20:36:15+5:30
वणी जवळील लालपुलीयावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

वणी जवळील अपघातात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
यवतमाळ- वणी जवळील लालपुलीयावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अविनाश मधुकर ईग्रतवार(30)रा.बल्लारशा व त्याचा मित्र दुचाकी (क्र.एमएच 34 एएफ 3806) ने वणी वरुन राजुरला मावशीच्या मय्यतीच्या कार्यक्रमाला जात होते.
वणी- मारेगाव रोडवर लालपुलीया येथे एका उभ्या ट्रक (क्र.एमएच 28 बि 8382) ला दुचाकींने मागुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका ईसमाचा म्रुत्यु झाला. तर अविनाश मधुकर ईग्रतवार हा गंभिर जखमी झाला. या दोघांनाही प्रथम वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर जखमी असलेल्या अविनाशचा प्रथम उपचार करुन त्याला चंद्रपुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ट्रक चालकावर वणी पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. मृतांची अद्याप ओळख पटू शकली नाही.