शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड वार्डात दररोज लागतात दीडशे ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमित पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : तिप्पट वापर, पुरवठा मात्र मुबलक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा रुग्णाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यामुळेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. येथे कोविड वॉर्डामध्ये दिवसाला १५० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे.वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमित पुरवठा केला जात आहे.पूर्वी रुग्णालयात दिवसाला ४० ते ५० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. त्यावेळी केवळ एकच ऑक्सिजन युनिट कार्यरत होते. कोविड काळात जुन्या इमारतीमध्ये नव्याने दोन ऑक्सिजन युनिट तयार केले आहे. यामध्ये एका वेळी १५० सिलिंडर लावण्याची सुविधा आहे. थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पूर्ण दाबाने ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. त्यासाठी ही व्यवस्था केली आहे. आता कोविड रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचा करार झाला असल्याने १९० रूपयांत सिलिंडर रिफिल करून मिळत आहे. प्रसंगी युनिट वाढविण्यास प्रशासन सज्ज आहे.९५ टक्के प्रमाण गरजेचेकोविड रुग्णाला बऱ्याचदा व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. त्यासाठीही ऑक्सिजन महत्वाचा आहे. त्यादृष्टीने सोयी सुविधा तयार केल्या आहेत. कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९५ टक्केपेक्षा अधिक ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोविड उपचारातील हा एक महत्वाचा घटक आहे. त्याबाबत परिपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल