शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रंटची जागृती मोहीम

By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST

ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे.

यवतमाळ : ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे. आता यापुढे ही मोहीम आर्णी विधानसभेत राबविणार असल्याचे फ्रंटचे सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत सांगितली. यावेळी डॉ. दिलीप महाले, ज्ञानेश्वर गोबरे, राजेश मुके, संजय मादेशवार, उत्तम गुल्हाने, मायाताई गोबरे, योगेश धानोरकर, साहेबराव पवार उपस्थित होते. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. सामाजिक न्यायमंत्री आदिवासींच्या हक्कासाठी स्वत: रस्त्यावर उतरत आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीच्या मागण्यांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहे. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांना विश्रामगृहात घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता ते मागच्या दाराने निघून गेले. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण, जातीनिहाय जनगणना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना व वरील प्रवर्गासाठी स्वतंत्र वसतिगृह अशा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहे. आता यासाठी घरोघरी जावून जागृती केली जाणार आहे. याची सुरुवात सामाजिक न्यायमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रातून करणार असल्याचे देवानंद पवार यांनी यावेळी पत्रपरिषदेत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)