शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्य, यजमानांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

कोरोनाच्या नियमावलीत लग्न करताना प्रत्येक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्याकरिता वधू आणि वर मंडळींना अलीकडच्या काळात मॅचिंग मास्क शिवले जात आहेत. अनेकांना बोलविण्याची, आतषबाजी न करण्याची नियमावली आहे. यामुळे ही मंडळी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. अनेकांनी काही महिन्यांपूर्वी मंगल कार्यालय, बिछायत, कॅटरर्स बूक केले. आता साध्या पद्धतीत हे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे वधू आणि वरपिता या मंडळींना पैसे परत करण्याची मागणी करतात.

ठळक मुद्दे५० जणांनाच परवानगी

    लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले. आज ना उद्या कोरोना संपेल आणि आपल्या मुलांचे लग्न थाटात करू, या विचाराने अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. मात्र, कोरोना संपायचे नाव घेत नाही. त्याचा धोकाही थांबला नाही. या परिस्थितीत लग्नकार्य उरकून टाकण्याची घाई लग्नघरातील प्रमुख मंडळींना लागली आहे. कोरोनाच्या नियमावलीत लग्न करताना प्रत्येक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्याकरिता वधू आणि वर मंडळींना अलीकडच्या काळात मॅचिंग मास्क शिवले जात आहेत. अनेकांना बोलविण्याची, आतषबाजी न करण्याची नियमावली आहे. यामुळे ही मंडळी साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत आहे. अनेकांनी काही महिन्यांपूर्वी मंगल कार्यालय, बिछायत, कॅटरर्स बूक केले. आता साध्या पद्धतीत हे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे वधू आणि वरपिता या मंडळींना पैसे परत करण्याची मागणी करतात. मात्र, एकदा मिळालेला ॲडव्हान्स परत मिळत नाही. याशिवाय या मंडळींचाही रोजगार बुडाला आहे. या सर्व बाबींचा फटका लग्नघरी बसला आहे. पत्रिका नाही त्याजागी व्हाॅट्सॲप आणि थेट प्रसारण करण्यासाठी फेसबूक लाईव्ह वापरले जात आहे.

लग्नासाठी नियमावलीलग्नासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी नियमावली आहे. यवतमाळ जिल्ह्यात साधे आणि सोपे नियम आहेत. यामध्ये प्रामुख्याने लग्नासाठी ५० वऱ्हाडी मंडळी ठेवण्याचा आदेश आहे. याशिवाय लग्नमंडपी सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्स पाळावे लागणार आहे आणि मास्कचा वापर करायचा आहे.

लग्न म्हटलं तर गणगोत आलंच. आता कोरोनामुळे गणगोतामधील मंडळींना बोलवायचे की  मित्रमंडळींना असा प्रश्न आहे. कोरोनामुळे लग्नमंडपी अनेक अडचणी येत आहेत. त्यातही शासनाच्या नियमावलीनुसार लग्नसोहळा पार पाडण्यासाठी तयारी केली जात आहे.- गणेश बयस, वरपिता

परवानगीसाठी पार करावे लागते दिव्य मंगल कार्यालयासाठी मोठा ॲडव्हान्स वर आणि वधूपित्यांनी दिला आहे. नवीन नियमांमुळे हा ॲडव्हान्स परत मागितल्यावर  मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन पैसे परत करत नाहीत.वधू आणि वरपिता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक मंडळींची परवानगी मिळावी, याकरिता चकरा माराव्या लागतात. मात्र नियमांचे उल्लंघन करू नका, असा सल्ला दिला जातो.

आमच्या घरातील भाऊबंदकी ७५ जणांच्यावर आहे. शासनाच्या नियमामुळे ५० लाेकांनाच बोलविता येणार आहे. मंगल कार्यालयात किमान २०० लोकांना तरी परवानगी पाहिजे होती. आता कोणाला बोलवावे, हा प्रश्न आहे. लग्नप्रसंग ऑनलाईन प्रसारित होणार आहे. - पंडित हिंगासपुरे, वधूपिता

टॅग्स :marriageलग्न