निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:52 IST2024-04-14T05:52:21+5:302024-04-14T05:52:35+5:30

शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडलेल्या या घटनेत तिघींचाही बुडून मृत्यू झाला.   

Nirmalya went for immersion, and the three did not return | निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही...

निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही...

लोकमत न्यूज नेटवर्क, आर्णी (यवतमाळ): कवठाबाजार येथे एका कुटुंबातील महिला निर्माल्य वाहण्यासाठी पैनगंगा नदीवर पाेहाेचल्या. तेथे एका चिमुकलीचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिची बहीण व महिला सुद्धा पाण्यात पडली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडलेल्या या घटनेत तिघींचाही बुडून मृत्यू झाला.   

प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३५), अक्षरा नीलेश चौधरी (११) आणि आराध्या नीलेश चौधरी (८) अशी मृतांची नावे आहेत. नदीपात्रात आराध्याचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण अक्षरा व  काकू प्रतीक्षा या पुढे सरसावल्या, मात्र तिघींचाही बुडून मृत्यू झाला आहे.  

Web Title: Nirmalya went for immersion, and the three did not return