शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नऊ कोटी $$्निरूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ

By admin | Updated: September 27, 2016 03:17 IST

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ९ कोटींची तरतुद करण्यात आली असून दुर्लक्षित स्थळे पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. जिल्ह्यात क वर्ग पर्र्र्र्यटनाची ३२ ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील दोन पर्यटनस्थळे प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून विकसीत करण्यात येणार आहे. तर या सोबतच राज्य शासनाने जिल्ह्यात दोन स्थळांना वन पर्यटनाचा दर्जा दिला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निधी अपूरा आहे. क वर्ग पर्यटनासाठी जिल्हा नियोजन विकासातून १ कोटी रूपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. या माध्यमातून ३२ स्थळे विकसीत करण्यात येणार आहे. त्या आराखडा नियोजन विभागाने तयार केला आहे. त्या दृष्टीने कामाला सूरूवात झाली आहे. प्रादेशिक पर्र्यटन विकास निधीतून मोठा निधी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून फार तोकडा निधी पर्यटनासाठी उपलब्ध होतो. मात्र प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून मोठी तरतुद करता येते. जिल्ह्यातील दोन ठिकाणाच्या विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि कळंब तालुक्यातील दत्तापूर या ठिकाणाचा विकास करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्पाच्या पर्यटन विकासासाठी तीन कोटी ५६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ८६ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी वळता झाला आहे. यातून पर्यटन निवासस्थाने, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, जमीन सपाटीकरण, परिसर सुशोभिकरण या प्रमुख बाबींचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील दत्तापूर हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणचा तलाव, हिरवळ पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या ठिकाणाच्या विकासासाठी पाच कोटी ६४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. मंजूर निधीपैकी २ कोटी १६ लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. १ कोटी ७६ लाख रूपयांच्या खर्चातून काही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. ही आहेत ३२ स्थळे ४जिल्ह्याच्या क वर्ग पर्र्र्यटन स्थळांच्या यादीत यादीत यवतमाळ तालुका ढुमणापूर, वसंतस्मृती उद्यान, जामवाडी, निळोना, उमर्डा नर्सरी, मनदेव देवस्थान, मनपूर, जेतवन पॅलेस, उमरखेड तालुका तपोवन, कवडशी, सहस्त्रकुंड, अंबोना तलाव. कळंब तालुका खटेश्वर संस्थान, निरंजन माहूर, दत्तापूर, मांजरा, आनंद दत्तब्रम्हगड, नागभूमी प्रज्ञा बुध्दविहार खटेश्वर. मारेगाव तालुका पांढरदेवी, नवरगांव, जुंजाई धबधबा, कोसारा. दारव्हा तालुका गोखी प्रकल्प, रंगो बापूजींचे समाधीस्थळ, कुंभारकिन्ही धरण. नेर तालुका पाथ्रट गोळे, सिरसगाव, चिंतामणी खोंड्या बारड टेकडी (शिरसगाव पांढरी), पुसद तालुका धुंदी, झरी तालुका मुळगव्हाण. राळेगाव तालुका वरध, पूरातन मालगुजरी तलाव. दिग्रस तालुका भवानीमाता टेकडी. बाभुळगाव तालुका पहूर, मादनी यांचा समावेश आहे. राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठे नियोजन केले जात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. चिंतामणी, सहस्त्रकुंड यासह अनेक ठिकाणाचा विकास झाल्याचे चित्र पहायला मिळेल. - मदन येरावार, राज्यमंत्री, पर्यटन विकास वनपर्यटनाच्यादृष्टीने टिपेश्वर अभयारण्य सर्वात मोठे आहे. याठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी पर्यटक इच्छुक आहेत. मात्र सोयीसुविधांचाच अभाव आहे. प्राथमिक सुविधा पुरविण्यासोबत रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. - मिलींद धुर्वे, सदस्य, जिल्हा परिषद