शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून होतो. या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला डास, चावणाऱ्या माशा तसेच गोचिड यांच्या माध्यमातून होतो.

ठळक मुद्देलंपी स्कीन डिसिजची लागण : चंद्रपूरमार्गे यवतमाळ जिल्ह्यात झाला शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कवणी/मारेगाव : चंद्रपूरमार्गे यवतमाळ जिल्ह्यात शिरकाव झालेल्या ‘लंपी स्कीन डिसिज’ची वणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील पशुधनांना लागण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून होतो. या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधनापासून दुसऱ्या पशुधनाला डास, चावणाऱ्या माशा तसेच गोचिड यांच्या माध्यमातून होतो. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. आजाराने बाधित झालेल्या जनावरांना डोके, मान, पोट, पाठ तसेच पाय, शेपटी आणि त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. काही दिवसानंतर त्यातून पस येण्याची शक्यता असते. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्येदेखिल गाठी आढळून येतात. गं्रथीला सुज येणे, पुढील व मागील पायांवर सुज असणे, अशी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. या आजारात ताप येतो. डोळे, नाकातून स्त्राव गळतो.गोठ्याची स्वच्छता गरजेचीया आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुधन पालकांनी गोठ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या पशुधनाला या आजाराची बाधा लवकर होते. ज्या पशुधनाला या आजाराची बाधा झाली, त्याचे विलगीकरण करणे गरजेचे असते, अशी माहिती वणीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.मंदार मराठे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य