शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष राकाँचाच

By admin | Updated: September 13, 2014 00:33 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय नवा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच राहील असा दावा राष्ट्रवादीचे ....

यवतमाळ : जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय नवा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच राहील असा दावा राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी केला आहे. काँग्रेसला उपाध्यक्षपद दिले जाईल असे त्यांनी सांगितले. याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच स्थानिक पातळीवर एकमेकावर कूरघोडी करण्यात व्यस्त असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सामोपचाराची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित मानले जात होते. आज यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला ना.मनोहरराव नाईक, राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते. या संयुक्त बैठकीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष तसेच पंचायत समितीमध्येसुद्धा राष्ट्रवादीचा सभापती राहणार असल्याचे आमदार बाजोरिया यांनी सांगितले आहे. अध्यक्ष व सभापतीपदाचा उमेदवार कोण राहणार या बाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. १४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभापती तर २१ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया घेतली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)