शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

नेर ‘आरोग्य’ची उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल संगोपनाचे कार्यक्रम राबविले जातात. पंधरवाडा, सप्ताह घेऊन आरोग्य विभागाच्या योजना सांगितल्या जातात. याचा केवळ गवगवा होतो. प्रत्यक्ष लोकांना किती चांगल्या सुविधा मिळतात, हा प्रश्नच आहे. गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर आरोग्य सुविधा पुरवावी लागते.

ठळक मुद्देरस्त्यावर बाळंतपण : सुरक्षित प्रसूतीच्या आरोग्य प्रशासनाच्या वल्गनाच

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : सुरक्षित मातृत्त्वासाठी प्रसूती रुग्णालयातच करा, असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. प्रत्यक्षात गर्भवतींना त्यादृष्टीने सुविधा मिळत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना रेफरचा आजार जडला आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ दुसरीकडे पाठविले जाते. प्रसूतीच्या केसेसही टाळल्या जातात. अशावेळी शासनाच्या सुरक्षित प्रसूतीच्या केवळ वल्गना ठरत आहे. सोमवारी नेर येथे एका महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसूतीने याला बळ मिळाले आहे.आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल संगोपनाचे कार्यक्रम राबविले जातात. पंधरवाडा, सप्ताह घेऊन आरोग्य विभागाच्या योजना सांगितल्या जातात. याचा केवळ गवगवा होतो. प्रत्यक्ष लोकांना किती चांगल्या सुविधा मिळतात, हा प्रश्नच आहे. गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतर आरोग्य सुविधा पुरवावी लागते. अंगणवाडीच्या माध्यमातून या सेवा पुरविण्यात येतात. आरोग्य विभागाचे लाभ घेत असलेल्या महिलेची प्रसूती आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक आहे. परंतू ग्रामीण आरोग्य सेवेचा सुरू असलेला गोंधळ पाहता नागरिक शहराची वाट धरतात.ग्रामीण भागात नियमित तपासणी नाहीयेलगुंडा येथील दुर्गा ज्ञानेश्वर हाके हिला प्रसूतीकळा सुरू झाल्याने नेर येथे एका खासगी रुग्णालयात आणले. गावातून नेरपर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने तिला वेदना सुरू झाल्या. एका खासगी रुग्णालयात घेतले नसल्याने दुसऱ्या रुग्णालयाचा शोध पायदळ सुरू झाला. दरम्यान, दुर्गा हाके या ठेच लागून कोसळल्या. रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. या घटनेने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहे. दुर्गा हाके या महिलेला गावात नियमाप्रमाणे औषधोपचार, तपासण्या, सकस आहार मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. एकदाही तपासणी झाली नसल्याची माहिती मिळाली. आरोग्य विभागाचा हा सुस्तपणा जीवावर बेतण्याची भीती आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल