शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला.

ठळक मुद्देपुरवठा विभागापुढे ठिय्या : सोशल डिस्टसिंगचा फज्जा, वाढणारी गर्दी चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे दानदात्यांकडून वणी शहरातील गरजवंतांना धान्याचे वाटप केले जात आहे. परंतु तरीही दररोज वणीच्या तहसीलसमोर अनेकजण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. दानदाते व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला. परंतु तरीही तहसीलपुढे होणारी गर्दी सर्वांची चिंता वाढविणारी ठरत आहे. गुरूवारी वणी तहसील परिसरातील पुरवठा विभागासमोर अनेक महिला व पुरूष एकत्रितरित्या ठिय्या देऊन बसून असल्याचे चित्र पहायला मिळाले. विचारणा केली असता, राशन कार्ड अपडेट करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे त्यातील काहींनी सांगितले, तर काहीजणांनी आम्ही धान्यासाठी आल्याची माहिती दिली.केवळ तहसील कार्यालयच नाही, तर शहरातील अनेक नेत्यांच्या घरापुढेही दररोज काही महिला व पुरूष आम्हाला धान्य मिळत नाही, अशा तक्रारी करित गर्दी करत असल्याचे चित्रदेखील पहायला मिळत आहे. यात मदत मागणाºयांची संख्या मोठी असल्याने नेत्यांचा वैतागही वाढत आहे. मदत करायची तरी किती, असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. लॉकडाऊननंतर सुरूवातीच्या काळात मदतीचा ओघ प्रचंड होता. दानदात्यांनी तसेच काही सामाजिक संस्थांनी ज्या भागात मोलमजुरी करणारे लोक वास्तव्याला आहे, त्या भागात जाऊन एका कुटुंबाला १५ दिवस किंवा त्यापेक्षाही अधिक काळ धान्य पुरेल, अशा किटचे वितरण केले होते. त्यानंतर मात्र मदतीचा ओघ कमी झाला आहे. परिणामी रोजमजुरी करणाºयांपुढील समस्या वाढल्या आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिक