शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान

By admin | Updated: September 6, 2014 02:22 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे.

यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी एकदा तरी यवतमाळ अथवा दिग्रस मधून विधानसभा लढवावी, यवतमाळात काँग्रेससोबतच्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रवादी केव्हाही तयार आहे, असे आव्हान येथे आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी दिले आहे. दिग्रस मतदार संघात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे काहीच वजन नाही. म्हणूनच त्यांनी आपला परपंरागत मतदार संघ सोडून दिला आहे. येथे काँग्रेसचे दोन माजी मंत्री असूनही कोणीच शिवसेने विरोधात लढण्यास तयार नाही. प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावची ग्रामपंचायतही वाचविता आली नाही. त्यामुळे येथे डाळ शिजणार नाही हे त्याच्या लक्षात आले आहे. माणिकराव ठाकरे यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. यवतमाळ नगराध्यक्ष निवडीतही त्यांनी राष्ट्रवादीला मदत करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसचा उमेदवार उतरविण्यासाठी धडपड केली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत राहूनही विरोधकाप्रमाणे संघर्ष करावा लागला. काँग्रेसच्या मंत्र्यानी नेहमीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना त्याची जागा दाखविण्याचे काम जिल्ह्यात राष्ट्रवादी करणार आहे. राज्य पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात याची स्थिती वेगळी राहणार आहे. जिल्ह्यातील घाटाच्यावर म्हणजेच यवतमाळात राष्ट्रवादीची भूमिका पूर्णत: वेगळी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला जागा दाखविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)