शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पालिका माजी उपाध्यक्षाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:47 PM

येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्षाचा भाजी मार्केट परिसरात येत असताना रविवारी सकाळी आरोपीने घरासमोर अडवून खून केला. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहरात संतापाची लाट उसळली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे.

ठळक मुद्देदारव्हा शहरात तणाव : संचारबंदी सदृशस्थिती, पाच जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्षाचा भाजी मार्केट परिसरात येत असताना रविवारी सकाळी आरोपीने घरासमोर अडवून खून केला. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहरात संतापाची लाट उसळली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे.सुभाष चंद्रभान दुधे (४८) रा. बारीपुरा असे मृताचे नाव आहे. सुभाष दुधे यांची भाजी मंडीत अडत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आरोपींनी वाद घातला. त्यानंतर दुधे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार केले. भावाला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या संजय दुधे यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला. मात्र त्यांनी तेथून सुटका करून घेतली. संजय दुधे यांच्या तक्रारीवरून आरोपी संदीप सुधाकर तोटे (३६), अजय दिगांबर तोटे (४६), सुनील सुधाकर तोटे (३९), सुधाकर बंडाप्पा तोटे (७०), नंदा सुधाकर तोटे (५५), सीमा सुधाकर तोटे (२५) यांच्याविरुद्ध दारव्हा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दुधे यांच्या हत्येनंतर शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद झाली. तणावाची स्थिती असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पुसदचे एसडीपीओ राजू भुजबळ, परिविक्षाधीन एसडीपीओ सुदर्शन, गृह पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह गौतम, एलसीबी प्रमुख मुकुंद कुलकर्णी, ठाणेदार उत्तम चव्हाण, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, ठाणेदार अनिल किनगे, ठाणेदार सारंग मिरासी आदी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरात डेरा टाकून आहे. याशिवाय राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. वृत्तलिहिस्तोवर मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.आरोपीने घरासमोरच साधला डावसुभाष दुधे यांचे आरोपीच्या घरासमोरुनच जावे लागत होते. सकाळची घाईगडबीने जात असताना आरोपीने खूप केसेस लावल्याचे कारण पुढे करीत वाद घालत हल्ला केला.यवतमाळात युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेहघातपाताचा संशय : रात्रीपासून होता बेपत्तायवतमाळ : शहरातील अंबिकानगर परिसरातील सेजल रेसीडेन्सी येथे एका युवकाचा रविवारी दुपारी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.संघर्ष उर्फ मॅगी भीमराव सोनडवले (२४) रा. अशोकनगर असे मृताचे नाव आहे. मॅगी हा शनिवारी रात्री ८.३० वाजता दाऊ नावाच्या मित्रासोबत घराबाहेर निघून गेला. तो परतलाच नाही. सकाळी शोधाशोध केली असता आढळून आला नाही. दरम्यान रविवारी दुपारी अंबिकानगरच्या सेजल रेसीडेन्सी गार्डनमध्ये मॅगीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली, अशी तक्रार भीमराव विठ्ठल सोनडवले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. काही परिस्थितीजन्य पुराव्याचाही शोध घेण्यात आला. मात्र मृतदेहावर कुठलीही जखम आढळून आली नाही. त्यानंतर हे प्रकरण घातपाताचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी