पाणीदार गावाच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 09:47 PM2019-06-01T21:47:10+5:302019-06-01T21:48:03+5:30

दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे.

Moving towards a watery village | पाणीदार गावाच्या दिशेने वाटचाल

पाणीदार गावाच्या दिशेने वाटचाल

Next
ठळक मुद्देबोरीमहल वॉटरकपमध्ये । श्रमदानातून बांधले बंधारे, तयार केले खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे.
या गावातील नागरिकांनी श्रमदानातून बंधारे बांधले आहे. गावात ठिकठिकाणी शौचखड्डे तयार करण्यात आले आहे. गावाच्या परिसरात पाणी थांबेल यासाठी विविध उपचार केले आहे. यासाठी अनेकांनी श्रमदान तर काहींनी निधीची मदत केली आहे. वैष्णवी चिमुरकर (भानखेडे) यांनी तीन हजार रुपये मदत देऊन या उपक्रमाला हातभार लावला आहे. अशाप्रकारे अनेकांनी मदत देऊन कर्तव्य बजावले आहे.
श्रमदानासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक अरविंद झलके, धर्मपाल बागडे, वैष्णवी चिमुरकर, कल्पना डडमल, शांता नारनवरे, सोमित्रा राजनहीरे, लीला शिवरकर, मीना सोनवणे, चंद्रकला राजनहीरे, रवी राजनहीरे, रोशन निकोडे, हेमंत चुनारकर, सौरभ डडमल, पवन लोणबळे, सुरज मेश्राम, अमन निकुडे, लोकेश भोयर, यश निकुडे, पूर्वज डोंगरकर, शिवम पंधरे, कुणाल डोंगरकर, रुग्वेद गेडाम, चेतन भानखेडे, आदर्श भानखेडे, अनिल भानखेडे, विनोद दोंदल आदींनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांची साथ मिळत असल्याने वॉटर कप स्पर्धा जिंकली जाईल, असा आत्मविश्वास सर्वांना आहे. त्यांना याच ध्येयाने झपाटले आहे.

Web Title: Moving towards a watery village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.