शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा निर्णयाविरोधात फार्मसी कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, एटीकेटी व रेग्युलरच्या अंतिम वर्ष परीक्षेला केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारविरुद्ध रोष : पदवी परीक्षा घेण्यास विरोध, ‘एटीकेटी’ सुरू ठेवण्याची मागणी, पालक-विद्यार्थी संभ्रमीत

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर फामर्स कृती समितीने सोमवारी आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून आंदोलनात सहभाग घेतला.राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, एटीकेटी व रेग्युलरच्या अंतिम वर्ष परीक्षेला केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखाच्यावर पोहोचली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का?, हा विचार केंद्र सरकारने करायला हवा, अशी मागणी कृती समितीने केली.एकीकडे लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला धोका पोहोचवायचा, यात शहाणपण कसले, हे केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवे. त्यामुळे पदविका आणि पदवीचा बॅकलॉग, एटीकेटी व रेग्युलर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्या, यासाठी पहिल्या टप्प्यात आंदोलन केले. या आंदोलनातून निर्णयाला श्रद्धांजली वाहिली.केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला श्रद्धांजलीया अभिनव आंदोलनात केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घरी हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर निषेध व्यक्त करीत आंदोलनात सहभाग घेतला. पदविका आणि पदवीचा बॅकलॉग, एटीकेटी व रेग्युलर असलेल्या प्रथम, व्दितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी व पालक यांनी आंदोलनात सहभागी होत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली, असे फार्मसी कृती समितीने जिल्हाध्यक्ष सुंदर नाईक, उपाध्यक्ष साद खान यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या