शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकापसालाही फटका : जिल्ह्यात भाजीपाला, फुलपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने कास्तकारांना चांगलाच हादरा दिला असून रविवारी बरसलेल्या पावसाने शेतपिकांच्या नुकसानीत आणखी भर घातली. दरवर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत माघारी फिरणारा पाऊस यंदा लांबला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा मुक्काम वाढला आहे. यामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसण्याचे संकेत दिले आहेत.यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.सोयाबीनला उतारा कमी झाला आहे. त्यातही हातात पडणारे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. यामुळे पांढरी बुरशी पडून सोयाबीन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनच्या गंज्यामधून वाफा निघत आहेत. काळवंडलेले सोयाबीन हातात पडल्याने शेतकरी हादरले आहे. कापूस वेचणीसाठी गावामध्ये मजूरच मिळत नाही. यातून कापसाचेही नुकसान होत आहे. पावसाने बोंड सडून कास्तकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.भाजीपाला आणि फुलपिकांना पावसाने मोठा फटका बसला आहे. यावर्षी विजयादशमीला झेंडूची फुले विक्रीसाठी येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजीपाला उत्पादनाला पावसाने मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. शेतकरी चिंतेत पडले आहेत.पावसाचा वाढलेला मुक्काम धोकादायकआंध्र आणि तेलंगानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे वाऱ्याची गती कमी झाली आहे. बाष्प घेऊन येणारे ढग मोठ्या प्रमाणात विदर्भात आगेकूच करीत आहेत. या बाष्पयुक्त ढगांची संख्या वाढत असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा वाढलेला मुक्काम पिकांसाठी हानीकारक आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस माघारी फिरतो. यावर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत तो राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात कमी दाबाच्या पट्ट्याने यंदा परतीच्या पावसाचा मुक्कामआणखी लांबला आहे. पावसामुळे रबीचाही हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Rainपाऊस