मंत्र्यांच्या काकांचे घर फोडले

By Admin | Updated: February 26, 2015 01:55 IST2015-02-26T01:55:41+5:302015-02-26T01:55:41+5:30

जिल्ह्यातील चोरी आणि घरफोड्यांच्या सत्राचा फटका महसूल राज्यमंत्र्यांच्या काकांनाही बसला.

Ministers of the house were dismantled | मंत्र्यांच्या काकांचे घर फोडले

मंत्र्यांच्या काकांचे घर फोडले

यवतमाळ : जिल्ह्यातील चोरी आणि घरफोड्यांच्या सत्राचा फटका महसूल राज्यमंत्र्यांच्या काकांनाही बसला. कळंब तालुक्यातील पहुर इजारा येथे बुधवारी उघडकीस आलेल्या चोरीने पोलिसांची झोप उडाली आहे. एरव्ही माहिती देऊन घटनास्थळ न येणारे पोलीस मात्र श्वान पथकासह तत्काळ पोहोचले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे काका लक्ष्मण संगदाजी राठोड यांचे पहूर इजारा येथे घर आहे. ते कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडले. तसेच दोन चांदीचे ग्लास, एक चांदीचे ताट, चांदीचे ६० नाणे, रोख अडीच हजार आणि एक कट्यार असा एकूण ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Ministers of the house were dismantled