शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खाणीला १२४ कोटींचा लाभ

By admin | Updated: December 24, 2015 03:04 IST

तालुक्यातील उकणी येथील वेकोलिच्या कोळसा खाणीला एका वर्षात तब्बल १२४ कोटींचा विक्रमी लाभ झाला आहे.

उकणी कोळसा खाण : वणी नॉर्थ एरियात रोल मॉडल बनली खाणआसिफ शेख वणीतालुक्यातील उकणी येथील वेकोलिच्या कोळसा खाणीला एका वर्षात तब्बल १२४ कोटींचा विक्रमी लाभ झाला आहे. ही खाण इतर खाणींसाठी आता आदर्श ठरली आहे.उकणी कोळसा खाणीत आजपर्यंत एकही दुर्घटना घडली नाही. या खाणीचे काम वणी नॉर्थ एरियात प्रगतीपथावर आहे. खाणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे खाणीने १२४ कोटींचा लाभ कमाविला आहे. या खाणीची स्थापना सन १९८२ मध्ये झाली. गेल्यावर्षी या खाणीने विक्रमी उत्पादन घेऊन खाणीचे नाव उंचावले होते. उकणी कोळसा खाणीत तब्बल २८.६ मीलीयन टन कोळसा असून सर्वात जास्त उत्पादन देणारी ही खाण आहे. या खाणीत एकूण ८०० कामगार कार्यरत आहे. याशिवाय एक हजार कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. विशेष म्हणजे या खाणीत आत्तापर्यंत कोणतीच दुर्घटना घडली नाही. त्यासाठी कामगारांचे प्रयत्न कारणीभूत आहे. तसेच पाच कामगार युनियनही खाणीचे नाव उज्वल करण्यासाठी सहकार्य करतात. या खाणीला यावर्षी आठ लाख १७ हजार टन कोळसा काढण्याचे उद्दीष्ट होते. खाणीने उद्दीष्टापेक्षा तीन लाख ३५ हजार टन जादा कोळसा काढून एकूण ११ लाख ७० हजार टन कोळसा काढला आहे.या खाणीला ओवर बर्डनचे उद्दीष्ट १८ लाख ७३ क्युब्येक मीटरचे होते. प्रत्यक्षात खाणीने २४ लाख क्युबेक मीटर ओ.बी.काढून पाच लाख ४५ हजार कुब्येक मीटरची वाढ केली. कंत्राटी पद्धतीने एक लाख १७ हजार जास्त ओ.बी.काढण्यात आली. या खाणीमधून चांगल्या प्रतिचा व गुणवत्तेचा कोळसा निघतो. गेल्यावर्षी खाणीने आठ लाख १२ हजार टन कोळसा रवाना करण्याचा निर्धार केला होता. प्रत्यक्षात खाणीने १२ लाख ८० हजार टन कोळसा ग्राहकांना वितरीत केला. गेल्यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी आठ लाख रूपयांनी ही खाण नफ्यात होती. यावर्षी खाणीने तब्बल १२४ कोटींचा लाभ करून गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ कोटी ४२ लाखांची विक्रमी वाढ नोंदविली. या खाणीत सन २०१४ मध्ये अतिपावसाने मोठ्या प्रमाणात मातीचे भूस्खलन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे २०१५ मध्ये या खाणीचे उत्पादन काही काळ ठप्पसुद्धा पडले होते. मात्र कामगारांनी जीवाचे रान करून परिस्थितीवर मात केली. परिसरात १२ लाख वृक्षांचे रोपणया कोळसा खाण परिसरात आत्तापर्यंत तब्बल १२ लाख झाडे लावण्यात आली. ती पर्यावरणाचा समतोल राखत आहे. तब्बल ५५२ हेक्टरमध्ये ही झाडे जिवंत आहे. १८२ स्प्रिंक्लर व सहा टँकरद्वारे त्यांना पाणी देण्यात येते. परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यात येत आहे. इतर कोळसा खाणींपेक्षा उकणी कोळसा खाण उत्पन्न काढण्यात पुढे आहे. मात्र खाणीची जागा लहान असल्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. पुन्हा जागा मिळाल्यास जगात ही खाण प्रगतीपथावर राहिल, असे मत वेकोलिचे महाप्रबंधक डी.एम.गोखले यांनी व्यक्त केले. वणी नॉर्थ एरियात कोलार-पिंपरी, घोन्सा, जुनाडा, भांदेवाडा, पिंंपळगाव खाणी येतात. मात्र त्यातून केवळ ३० टक्केच उत्पादन मिळते. एकट्या उकणी कोळसा खाणीतून तब्बल ७० टक्के उत्पादन घेतले जाते.