शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

खेळाडू कर्मचाऱ्यांचा लाखोंचा जुगार मॅनेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:54 IST

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील नेहरू स्टेडियम संकुलात सुरू असलेल्या जुगारावर रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. त्यातून मोठी रक्कम हस्तगत करून २७ खेळाडू कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र प्रत्यक्ष कारवाईत केवळ आठ जणांचीच नावे रेकॉर्डवर आली असून जप्त केलेली रक्कमही केवळ दहा हजारच दर्शवून लाखो रूपये पोलिसांनी दडपल्याची चर्चा आहे.येथील नेहरू ...

ठळक मुद्दे आठ हजार रेकॉर्डवर : क्रीडा संकुलातील घटना २७ कर्मचाऱ्यांकडून झाली वसुलीकेवळ चौघांवर गुन्हा दाखलजिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील नेहरू स्टेडियम संकुलात सुरू असलेल्या जुगारावर रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. त्यातून मोठी रक्कम हस्तगत करून २७ खेळाडू कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र प्रत्यक्ष कारवाईत केवळ आठ जणांचीच नावे रेकॉर्डवर आली असून जप्त केलेली रक्कमही केवळ दहा हजारच दर्शवून लाखो रूपये पोलिसांनी दडपल्याची चर्चा आहे.येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी जिल्हाभरातून शिक्षक व कर्मचारी आले आहेत. शुक्रवारी स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेसाठी जिल्हाभरातून आलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षकांचा नेहरू स्टेडीयम संकुलात मुक्काम आहे. येथे कर्मचाºयांचा मेळ जमल्यानंतर जुगाराचा डावही रंगतो, हे सर्वश्रृत आहे. हाच धागा पकडून रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने तेथे धाड टाकली. यावेळी जुगार चांगलाच रंगात आला होता. पोलिसांना या डावातूनच हारलेल्या एकाने टीप दिली होती. त्यावरून हा जुगार रंगेहात पकडण्यात आला.जुगार खेळताना किमान ३० ते ४० जण उपस्थित होते. खेळणाऱ्यांमध्ये २७ जणांचा समावेश होता. सर्व कर्मचारी असल्याने डावातील रक्कमही लाखोंच्या घरात होती. मात्र ऐनवेळी पोलिसांची धाड पडल्याने सर्वांची तारांबळ उडाली. ‘इन कॅमेरा’ कारवाई सुरू असल्याचे भासविण्यात आले. एवढेच नव्हे, तर काही माध्यमांचे प्रतिनिधीही आमच्या सोबत आहे, असेही या खेळाडू कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. नसती आफत नको म्हणून बोलणी सुरू झाली. अखेर विनोद रमाकांत शर्मा (रा. धर्माजीनगर, वडगाव), रामू कर्णू पेंदोर (रा. टिटवी, घाटंजी), विकास मधुकर पारखी (रा. संकटमोचन), बळवंत दादाराव राऊत (दत्त चौक, अमराईपुरा) या चौघांना रेकॉर्डवर घेत आठ हजारांची रक्कम जप्त झाल्याचे दाखविण्यात आले.या जुगाराच्या गुन्ह्यात नाव रेकॉर्डवर येऊ नये, यासाठी अनेकांनी मोठी रक्कम मोजली आहे. ३० ते ३५ हजार रुपये प्रत्येकी देऊन प्रकरण निस्तारण्याचे प्रयत्न करण्यात आले. यापूर्वीही अवधुतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मोठे वडगाव परिसरातील बंड्यावरची मोठी जुगार ‘रेड’ काही हजारातच दडपण्यात आली. दिवसेंदिवस या ठाण्यातील असे प्रकार वाढीस लागले आहे. पूर्वी नेहमीच अशा घटना होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशीही झाली होती. त्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. आता नेहरू स्टेडियमच्या जुगार धाडीनंतर पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याचे दिसून येते.रविवारी कर्मचारी पतसंस्थेतजुगाराच्या गुन्ह्यात नाव येऊ नये, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी गोदणी रोडवरील पतसंस्थेत धाव घेतली. रविवार असूनही पतसंस्थेत चांगलीच वर्दळ होती. पतसंस्थेतून वैयक्तिक कर्ज घेऊन प्रकरण निस्तारण्याचा खटाटोप अनेक कर्मचारी करीत होते.

टॅग्स :Crimeगुन्हा