लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला भोसा परिसर प्रशासनाने सील केला आहे. या भागात आशा स्वयंसेविकांमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दोन आशांना डेहनकर ले-आऊटमध्ये काही युवकांनी अश्लील शिवीगाळ केली. या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठा जमाव रस्त्यावर आला होता. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.भोसा परिसरातील डेहनकर ले-आऊटमध्ये आशा दीपा झोंबाडे व सविता बागडे या दोघी नेहमीप्रमाणे सर्वेक्षणाचे काम करत होत्या. दोन युवकांनी त्यांना परिसरात येण्यास मज्जाव करत अश्लील शिवीगाळ केली. वाद नको म्हणून या आशांनी तो भाग सोडून लगतच्या परिसरात सर्वेक्षण सुरू केले. तेथेही ते दोन युवक पाठलाग करत आले. अखेर त्यांनी घटनेची माहिती आरोग्य उपकेंद्रातील पर्यवेक्षकाला दिली. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डेहणकर ले-आऊट परिसरातील दोन युवकांना ताब्यात घेतले.युवकाला ताब्यात घेतल्यामुळे परिसरात मोठा जमाव घराबाहेर पडला. त्या युवकांना नेऊ नका यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून शिवीगाळ सुरू केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना बळाचा वापर केला. काही मिनिटातच हा जमाव पांगला. परिस्थिती नियंत्रणात आली. त्या दोघांना अवधूतवाडी पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र या घटनेबाबत अधीक्षकांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले. दिवसातून एकदा या भागात भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.‘त्या’ महाभागांना धडा शिकविण्याची मागणीभोसा हा परिसर सील असला तरी गावातील अंतर्गत भागात सर्वच प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. चौकाचौकात युवकांचे जत्थे बसून असतात. काही ठिकाणी तर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे. आशा सर्वेक्षणासाठी आल्यानंतर हे टवाळखोर युवक त्यांच्याशी असभ्य वर्तन करत आहे. मात्र आपले काम बरे म्हणून आशांकडून बºयाचदा तक्रारी केल्या जात नाही, अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करून काम करत असल्याचे आशा स्वयंसेविकांनी सांगितले. नागरिक सहकार्य करत असले तरी काही महाभाग विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी आशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे केल्या.
प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST
भोसा परिसरातील डेहनकर ले-आऊटमध्ये आशा दीपा झोंबाडे व सविता बागडे या दोघी नेहमीप्रमाणे सर्वेक्षणाचे काम करत होत्या. दोन युवकांनी त्यांना परिसरात येण्यास मज्जाव करत अश्लील शिवीगाळ केली. वाद नको म्हणून या आशांनी तो भाग सोडून लगतच्या परिसरात सर्वेक्षण सुरू केले. तेथेही ते दोन युवक पाठलाग करत आले. अखेर त्यांनी घटनेची माहिती आरोग्य उपकेंद्रातील पर्यवेक्षकाला दिली. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
ठळक मुद्देसर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना शिवीगाळ : दोघांना अटक, अखेर जमाव पांगविला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}